विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील छप्रा मंतदारसंघातील भाजपचे खासदार राजीवप्रताप रुडी यांच्या ४० रुग्णवाहिकांचा भांडाफोड करणाऱ्या जनअधिकार पक्षाचे प्रमुख राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांना स्थानिक पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.Pappu yadav arrested in Bihar
त्यांच्यावर लॉकडाउनच्या उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला आहे.त्यामुळे बिहारमध्ये कारोनोवरून राजकारण पेटण्याचा शक्यता निर्माण झाली आहे.
पप्पू यादव यांनी यावरून नितीश सरकावरवर जोरदार टीका केली आहे. याआधी रुग्णवाहिकांवरून राजीव प्रताप रुडी आणि पप्पू यादव यांच्यात जोरदार वाद झाले होते.
त्यामुळे एकूणच बिहारमधील राजकीय वातावरण तापले होते. आता यादव यांच्या अटकेने त्यात भर पडली आहे.या कारवाईनंतर केलेल्या ट्विटमध्ये पप्पू यादव यांनी म्हटले आहे की, ‘‘ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पोलिस संरक्षणामध्ये माझा खून करायचा आहे.’’
आज सकाळी पाच पोलिस ठाण्यांमधील पोलिसांनी मिळून यादव यांच्याविरोधात ही कारवाई केली. याआधी पप्पू यादव आणि त्यांच्या समर्थकांनी रुग्णवाहिकांची तोडफोड केल्यानंतर छपरा येथील पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App