वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Pakistan पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ (LOC) 155 MM ट्रक-माउंटेड हॉवित्झर गन आणि इतर शस्त्रांची चाचणी केली आहे. मात्र, ही चाचणी कधी झाली याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.Pakistan
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, 155 एमएमची तोफ एका आखाती देशाच्या मदतीने चीनच्या संरक्षण कंपनीच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहे. ती अलीकडेच LOC जवळ दिसली. 155 मिमी तोफ ही SH-15 हॉवित्झरची आवृत्ती आहे, जी त्याच्या ‘शूट अँड स्कॉट’ (शूट अँड रन) साठी ओळखली जाते.
हॉवित्झर 155 एमएम तोफेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ती अनेक प्रकारच्या शस्त्रांनी हल्ला करण्यास सक्षम आहे. हे 30 किमी अंतरापर्यंत हल्ला करू शकते आणि एका मिनिटात 6 शेल फायर करू शकते.
M109 तोफेचीही चाचणी, 40 सेकंदात 6 शेल डागते
ज्या शस्त्रास्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे त्यात प्रगत M109 तोफेचाही समावेश आहे. हे 24 किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करू शकते आणि 40 सेकंदात 6 शेल फायर करू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानला पाश्चात्य देशांकडून एम 109 मिळाले होते. ते त्यांच्या प्रगत आवृत्तीची चाचणी घेत आहत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तुर्कस्तानने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे विकसित करण्यासाठी खूप मदत केली आहे. तुर्कीची संरक्षण कंपनी FNSS ने पाकिस्तानला 105 MM अत्याधुनिक तोफ दिली आहे. हे उच्च श्रेणीचे शेल फायर करण्यास सक्षम आहे.
चीनच्या मदतीने लष्करी क्षमता वाढवतोय पाकिस्तान
अधिकाऱ्यांनी सांगितले की, चीन पाकिस्तानला नियंत्रण रेषेवर लष्करी क्षमता वाढवण्यासाठी मदत करत आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान सीमेवर बंकर, ड्रोन, लढाऊ विमाने आणि उच्च श्रेणीतील दळणवळण यंत्रणा उभारत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, चीनच्या मदतीने पाकिस्तान सीमेवर एनक्रिप्टेड कम्युनिकेशन टॉवर आणि भूमिगत फायबर ऑप्टिकल केबल्स बसवत आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, चीनच्या नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेड (NORINCO) ने पाकिस्तानी लष्कराला 56 SH-15 हॉवित्झरची दुसरी तुकडी दिली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App