विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील बदलत्या राजकीय परिस्थिती दरम्यान भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानावर निशाणा साधत पाकिस्तान आपल्या भूमीवर आणि सीमेपलिकडेही ‘हिंसेच्या संस्कृती’ला प्रोत्साहन देत आहे, अशी टीका केली आहे.Pakistan promotes culture of violence, India targets in UN
संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनमध्ये प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत मंगळवारी बोलताना म्हणाल्या, शांततेची संस्कृती ही संमेलनामध्ये चर्चेसाठी केवळ एक अमूर्त मूल्य किंवा सिद्धांत नाही तर सदस्य देशांदरम्यान आंतरराष्ट्रीय संबंधांतही ही संस्कृती दिसून येणं गरजेचं आहे.
स्वत: आपल्या भूमीसोबतच सीमेपलिकडे हिंसाच्या संस्कृतीला प्रोत्साहन देत असताना पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाद्वारे भारताविरुद्ध घृणेनं भरलेल्या भाषणासाठी संयुक्त राष्ट्राच्या मंचाचा दुरुपयोग करण्याचा आणखी एक प्रयत्न आम्ही पाहिला, असं मैत्रा यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
मैत्रा म्हणाल्या, दहशतवाद हा सर्व धर्म आणि संस्कृतीचा शत्रू आहे. जगानं अशा दहशतवाद्यांबद्दल चिंता व्यक्त करायला हवी ज्यांनी अशी कृत्य अनुचित ठरवण्यासाठी धमार्ची मदत घेतली. भारताकडून नेहमीच मानवता, लोकशाही आणि अहिंसेचा संदेश दिला गेला आहे.
करोनासारख्या महामारीच्या काळातही आम्हाला असहिष्णुता, हिंसाचार आणि दहशतवादासारख्या घटनांत वाढ होताना दिसून आली. महामारी दरम्यान आम्ही दोन समाजांत घृणा फैलावण्यासाठी जबाबदार असणाºया सूचना आणि महामारी अर्थात ‘इन्फोडॅमिक’ आव्हानांचा सामना केला. मात्र, भारत विविधतेत एकता असणारा देश आहे.
बहुलतावाद ‘सर्व धर्म समभावा’सारख्या मूल्यांवर आधारीत आहे. भारत केवळ हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धमार्चं जन्मस्थान नाही तर अशी भूमी आहे जिथे इस्लाम, यहुदी, ख्रिश्चन आणि पारशी धर्मांचीही मजबूत मूळं प्रस्थापित झालेली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App