पाक पंतप्रधानांना भारतीय अर्थव्यवस्थेचा हेवा, म्हणाले- कष्ट करून इतर देशांना मागे टाकू

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : आर्थिक संकटाशी झुंजत असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, जर देशाने कठोर परिश्रम केले तर तो भारत आणि जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांना मागे टाकू शकतो.Pakistan Prime Minister is jealous of Indian economy, said – we will surpass other countries by working hard

पंतप्रधान शाहबाज शनिवारी इस्लामाबादमधील फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूमध्ये अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पोहोचले होते, तेथे त्यांनी हे वक्तव्य केले. मात्र, एकीकडे पाकिस्तान बड्या अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करण्याची भाषा करत असताना, दुसरीकडे देशात महागाई शिगेला पोहोचली आहे.



दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यांच्या किमती नियंत्रित करण्यातही सरकार अपयशी ठरत आहे. देशाचे कर्ज सतत वाढत आहे. पाकिस्तानच्या एरी न्यूजच्या वृत्तानुसार, देशातील दुधाची किंमत 210 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.

कर संकलन हेच ​​आमचे आव्हान- पाक पंतप्रधान

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ म्हणाले की, “पाकिस्तानला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यामध्ये कर संकलन हे आमचे सर्वात मोठे आव्हान आहे. कर संकलनानंतर आमचा महसूल वाढायला हवा होता, परंतु भ्रष्टाचारामुळे तसे होत नाही.”

पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजनुसार, देशात दरवर्षी 5.8 ट्रिलियन रुपयांची करचोरी होते. हे पाकिस्तानच्या जीडीपीच्या 6.9 टक्के आहे.

पीएम शाहबाज पुढे म्हणाले, “देशात 9.4 ट्रिलियन रुपयांच्या वार्षिक महसुलाच्या तुलनेत 24 ट्रिलियन रुपयांचा महसूल मिळवण्याची क्षमता आहे. परंतु भ्रष्टाचार आणि दुर्लक्षामुळे आम्ही ते करू शकत नाही. ज्या देशांनी स्वतःवर विश्वास ठेवला ते पुेढे जात आहेत. तर आम्हाला वारंवार कर्ज मागण्यासाठी IMF कडे जावे लागत आहे.

पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या म्हणजे करचोरी. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही या समस्येचा अनेकदा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूने (FBR) कर संकलनासाठी एक नवीन पद्धत आणली होती. एफबीआरने 15 मे पर्यंत कर जमा न केल्यास देशातील 5 लाखांहून अधिक थकबाकीदारांचे सिम निष्क्रिय केले जातील, असे म्हटले होते.

फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूने इन्कम टॅक्स जनरल ऑर्डर (ITGO) मध्ये म्हटले होते की 2023 मध्ये 5 लाखांहून अधिक लोक कर चुकवत होते. सक्रिय करदात्यांच्या यादीनुसार, 1 मार्चपर्यंत 40 लाख करदात्यांनी एफबीआरकडे कर भरला होता, तर गेल्या वर्षी हा आकडा 30 लाख 80 हजार होता. 2022 मध्ये करदात्यांची संख्या सुमारे 60 लाख होती.

Pakistan Prime Minister is jealous of Indian economy, said – we will surpass other countries by working hard

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात