विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतात अराजक माजवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ऍक्टिव्हेट केली. त्यामध्ये 2002 च्या अक्षरधाम मंदिरातल्या बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड फरहतउल्ला घोरी यालाही ऍक्टिव्ह केले असून त्याने भारतामध्ये रेल्वेत बॉम्ब फोडा, पेट्रोल लाईन तोडा आणि सत्ता ताब्यात घ्या!!, अशी चिथावणी दिली आहे. घोरी पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. Pak terrorist sounds large scale train derailment
फरहतउल्ला घोरी याने टेलिग्राम चॅनल वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतात हिंसाचार घडवायला चिथावणी दिली. यात त्याने रेल्वे लाईन उखडण्याच्या, मोठ्या प्रमाणावर रेल्वे रुळावरून उखडून टाकण्याच्या कारस्थानांना सुरुवात करायचे दहशतवाद्यांना आवाहन केले आहे. भारतामध्ये अराजक माजवायचे असेल, तर त्यांची सप्लाय चेन तोडा, पेट्रोल लाईन उखडून फेका त्यानंतर सत्ता हस्तगत होईल, असे त्याने व्हिडिओत म्हटले आहे.
भारतातल्या वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये दहशतवादी प्रवृत्ती शिरल्याचा संशय होताच. आणि तसे पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांना आढळले आहेतच. त्याचाच पुढचा भाग म्हणून फरहतउल्ला घोरी याने दिलेल्या चिथावणीकडे भारतीय सुरक्षा यंत्रणा पाहत आहेत.
भारतामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय ने वेगवेगळी दहशतवादी मोड्यूल्स ऍक्टिव्ह केली. त्यात फरहतुल्ला घोरी याचाही समावेश आहे. घोरीने भारतातल्या सीबीआय, ईडी या गुप्तचर संस्थांचाही व्हिडिओमध्ये हवाला देऊन या संस्था जर आपल्या मालमत्ता जप्त करत असतील, आपल्या मालमत्तांवर बुलडोजर फिरवत असतील, तर आपणही भारतामध्ये उत्पात घडवून आणला पाहिजे. त्यासाठी भारतातले रेल्वे रूळ उखडणे, भारताची सप्लाई चेन तोडणे, त्यांच्या मोठमोठ्या संस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले करणे असले प्रकार सुरू करण्याचे चिथावणी घोरीने दिली.
फरहतउल्ला घोरी हा मूळचा हैदराबादचा असून तो 2002 मध्ये गुजरात मध्ये झालेल्या अक्षरधाम मंदिरातल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या हल्ल्यानंतर तो पाकिस्तान पळून गेला. तिथे आयएसआयच्या हाताखाली काम करू लागला. त्यांनी वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांची भरती देखील केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App