संकटातही लाचखोरी : नेदरलँडहून 24 तासांत आले ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर, मुंबईहून इंदुरात यायला 48 तास लागले, लाच दिल्यानंतरच झाली सुटका

Oxygen concentrator arrives in 24 hours from Netherlands, it took 48 hours to reach Indore from Mumbai, released after paying bribe

Oxygen concentrator : कोरोना महामारीमुळे अवघ्या देशात भीतीचे वातावरण आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने नेदरलँड्समधून परदेशात वास्तव्यास असलेल्या इंदूरच्या नागरिकांच्या मदतीने 45 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी केले. यासाठी 30 लाख रुपयांचा खर्च आला. नेदरलँडहून अवघ्या 24 तासांत ते भारतात पोहाचले, पण येथील निलाजऱ्या व्यवस्थेने लाच घेतल्याशिवाय ते इंदुरात पोहोचू दिले नाहीत, तब्बल 48 तासांनंतर ते इंदुरात आले. Oxygen concentrator arrives in 24 hours from Netherlands, it took 48 hours to reach Indore from Mumbai, released after paying bribe


विशेष प्रतिनिधी

इंदूर : कोरोना महामारीमुळे अवघ्या देशात भीतीचे वातावरण आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने नेदरलँड्समधून परदेशात वास्तव्यास असलेल्या इंदूरच्या नागरिकांच्या मदतीने 45 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी केले. यासाठी 30 लाख रुपयांचा खर्च आला. नेदरलँडहून अवघ्या 24 तासांत ते भारतात पोहाचले, पण येथील निलाजऱ्या व्यवस्थेने लाच घेतल्याशिवाय ते इंदुरात पोहोचू दिले नाहीत, तब्बल 48 तासांनंतर ते इंदुरात आले.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आल्यावर तीन लाख रुपये कर भरावा लागला आणि एक हजार रुपये लाच द्यावी लागली, त्यानंतर कुठे हे ऑक्सिजन संयंत्र इंदुराकडे रवाना झाले. आपत्तीच्या काळातही लाचखोरी सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. इंदूरमधील कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने परदेशात राहणाऱ्या इंदूरच्या रहिवाशांच्या सहकार्याने नेदरलँड्समधून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची खरेदी केली.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससाठी परदेशात राहणाऱ्या इंदूरच्या लोकांनी सुमारे 18 लाख रुपये जमा केले. यानंतर सीए संस्थेने आपल्या सदस्यांकडून 12 लाख रुपये जमा केले. नेदरलँड्सकडून 30 लाख रुपयांमध्ये 45 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची खरेदी केली गेली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नेदरलँड सरकारने अवघ्या 24 तासांत ही सर्व संयंत्रे भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे पोहोचवली.

नेदरलँड्समधून निघालेली ऑक्सिजन संयंत्रे 7 हजार किमी अंतरावरील मुंबईत 3 मे रोजी पोहोचले. परंतु आपल्या देशात आल्यावर टॅक्स आणि नियम-अटींमुळे तसेच यंत्रणेतील भ्रष्टाचारामुळे तेथेच अडकून पडली. या ऑक्सिजन संयंत्रांना मुंबईहून सोडवण्यासाठी तीन लाख रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागली, त्यानंतर ट्रकही वाटेत थांबवण्यात आला. खूप वेळ तपासणीचा फार्स सुरू राहिला. वाटेत एक हजार रुपये लाचही द्यावी लागली, मग 48 तासांनी हे सर्व संयंत्रे इंदुरात पोहोचू शकेल.

यासंदर्भात असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सचे अध्यक्ष कीर्ती जोशी म्हणाले की, 3 मे रोजी मुंबईत दाखल झालेल्या ऑक्सिजन संयंत्रांना इंदुरा पोहोचण्यासाठी 5 मेची संध्याकाळ उजाडली. तेही तीन लाख रुपये टॅक्स आणि एक हजार रुपये लाच देऊन. यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Oxygen concentrator arrives in 24 hours from Netherlands, it took 48 hours to reach Indore from Mumbai, released after paying bribe

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*