आसामच्या मुख्यमंत्रिपदासाठी हेमंत बिस्व सरमांची निवड, उद्याच होऊ शकतो शपथविधी

Hemant Biswa Sarma New CM Of Assam Will Take Oath Tomorrow

Hemant Biswa Sarma New CM Of Assam : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आसाममध्ये दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली आहे. तथापि, निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, अनेक बैठकांनंतर हेमंत बिस्व सरमा यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. हेमंत सरमा हे आसामचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत. Hemant Biswa Sarma New CM Of Assam Will Take Oath Tomorrow


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आसाममध्ये दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली आहे. तथापि, निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, अनेक बैठकांनंतर हेमंत बिस्व सरमा यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. हेमंत सरमा हे आसामचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या हेमंत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. सर्वानंद सोनोवाल आणि हेमंत बिस्वा शर्मा यांना भाजपने बैठकीसाठी दिल्ली येथे बोलावले होते. दोन्ही नेत्यांनी काल दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर हेमंत बिस्व सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांना आपला राजीनामा सादर केला. आसाममधील भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी सर्वानंद यांनी राजीनामा दिला. विधिमंडळ पक्षाची बैठक आता सुरू झाली असून यामध्ये भाजपा नेते बी. एल. संतोष, बैजयंत पांडा आणि अजय जामवाल उपस्थित आहेत. केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह उपस्थित आहेत. आता सरमा नवे मुख्यमंत्री होण्याचे ठरल्याने ते राज्यपालांची भेट घेऊन दावा सादर करतील. उद्याच शपथविधी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आसामच्या 126 मतदारसंघांपैकी भाजपने 60 जागा जिंकल्या, तर युतीतील आसाम गण परिषदेने नऊ आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल्सने सहा जागा जिंकल्या. निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली नव्हती. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सोनोवाल यांना पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले आणि निवडणूकही जिंकली होती. तेव्हा पहिल्यांदा ईशान्य भारतात पहिले भाजप सरकार आले होते.

Hemant Biswa Sarma New CM Of Assam Will Take Oath Tomorrow

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण