अशी ही पळवापळवी : महाराष्ट्रातील इतर जिल्हे उपाशी, आरोग्यमंत्री टोपेंचा जालना मात्र तुपाशी! लसीकरणातील भेदभावावरून केंद्राने मागितले स्पष्टीकरण

Central Govts Demands Clarification To Maha Govt On Why jalna District Got Extra Doses While Shortage in State

Jalna District Got Extra Doses : देशात तसेच तसेच राज्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे. लस, बेड, ऑक्सिजन, औषधे अशा सर्वच आघाड्यांवर सर्वसामान्यांची कुचंबणा होत आहे. असे असतानाच दुसरीकडे, व्यापक प्रमाणावर लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने लसीकरणातही भेदभाव केल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी लसींचा कोटा ठरवून दिलेला आहे, असे असतानाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्याला लसींच्या बाबतीत झुकते माप दिल्याचे समोर आले आहे. यावरून आता केंद्राने राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव व्यास यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. Central Govts Demands Clarification To Maha Govt On Why jalna District Got Extra Doses While Shortage in State


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात तसेच तसेच राज्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे. लस, बेड, ऑक्सिजन, औषधे अशा सर्वच आघाड्यांवर सर्वसामान्यांची कुचंबणा होत आहे. असे असतानाच दुसरीकडे, व्यापक प्रमाणावर लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने लसीकरणातही भेदभाव केल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी लसींचा कोटा ठरवून दिलेला आहे, असे असतानाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्याला लसींच्या बाबतीत झुकते माप दिल्याचे समोर आले आहे. यावरून आता केंद्राने राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव व्यास यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीची कमतरता भासत असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद पडलेली दिसून येत आहेत. अशात एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, इतर जिल्ह्यांमध्ये लसींची कमतरता असताना राजेश टोपेंच्या जालनामध्ये अतिरिक्त लसींचे वाटप केले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, 7 ते 9 एप्रिल दरम्यान, जेव्हा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लसीकरण केंद्रे बंद करावी लागली तेव्हा, जालनामध्ये आणखी किमान दहा दिवस पुरेल इतका लसींचा साठा होता. जालना जिल्ह्यात 17,000 व अधिक 60,000 लसीचे डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या गृहजिल्ह्याला 77,000 डोसेस देण्यास सांगितले होते. अहवालानुसार राज्य लसीकरण अधिकारी डॉ. डी.एन. पाटील यांनी 1 एप्रिल रोजी औरंगाबादहून जालन्याकडे 60,000 डोस वळविले. परंतु 7 ते 9 एप्रिलदरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला लसीचा अधिक पुरवठा करावा, असे सांगितले. त्यानंतर, टोपे यांनी जालना येथून जवळपासच्या जिल्ह्यात 15,000 डोस हस्तांतरित करण्यास परवानगी दिली.

केंद्राने मागितले स्पष्टीकरण

इंडियन एक्स्प्रेसच्या या वृत्ताची दखल घेत आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव विकास शील यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांना स्पष्टीकरण मागितले आहे. यानुसार कोविन पोर्टलवरील डाटानुसार जालना जिल्ह्याला जानेवारी 2021 मध्ये 4794 डोस मिळाले, फेब्रुवारी 2021 मध्ये 12016 डोस, मार्च 2021 मध्ये 53085 डोस, एप्रिल 2021 मध्ये 1,34,290 डोस मिळाले आहेत. जालन्याला खरोखरच झुकते माप मिळाले आहे का, याचा खुलासा आता आरोग्य सचिवांना मागण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून लसीकरणात भेदभाव?

दुसरीकडे, कोविन अॅपच्या माध्यमातून हा घोळ उघड झाल्याचे म्हणत लसीची पळवापळवी लपवण्यासाठीच राज्यासाठी नवीन अॅप बनवण्याची शिफारस करत होते का, असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला आहे. मुंबईत लसीकरण केंद्रे बंद असताना जालन्यात मात्र लसीचा साठा होता, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. या सर्व प्रकारावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Central Govts Demands Clarification To Maha Govt On Why jalna District Got Extra Doses While Shortage in State

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात