डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक ठार किंवा बेपत्ता झाले आहेत. प्रांतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कांगो नदीत घडली. बोटीवरील 100 हून अधिक लोक ठार झाले किंवा बेपत्ता झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना वायव्य मोंगला प्रांताचे राज्यपाल यांचे प्रवक्ते नेस्टर मॅग्बाडो म्हणाले की, 51 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर बोटीवरील अन्य 69 जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत 39 जण वाचले आहेत. Over 100 dead or missing after boat capsizes in Democratic Republic of Congo
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक ठार किंवा बेपत्ता झाले आहेत. प्रांतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कांगो नदीत घडली. बोटीवरील 100 हून अधिक लोक ठार झाले किंवा बेपत्ता झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना वायव्य मोंगला प्रांताचे राज्यपाल यांचे प्रवक्ते नेस्टर मॅग्बाडो म्हणाले की, 51 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर बोटीवरील अन्य 69 जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत 39 जण वाचले आहेत.
यापूर्वी कांगोमध्ये 15 फेब्रुवारी रोजी एक बोट पलटी झाल्याने 60 जणांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटनाही कांगो नदीतच घडली होती. बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, यामुळे बोट बुडाली. देशाचे मंत्री स्टीव्ह एमबिकाई यांनी सांगितले होते की, या बोटीवर 700 लोक होते. त्यांनी सांगितले होते की ही घटना देशातील माई-नोमाडबे प्रांतात घडली आहे. ही बोट किन्हासा प्रांतातून एक दिवस आधी माबंदकासाठी निघाली होती. बोट माई-नोमाडबे प्रांतातील लोंगगोला इकोटी गावाजवळ पोहोचली तेव्हा बुडाली.
कांगोमध्ये धोकादायक बोट दुर्घटना नित्याच्याच झाल्या आहेत. वास्तविक, देशभरात रस्ते खराब स्थितीत आहेत, ज्यामुळे लोक बोटीने प्रवास करणे पसंत करतात. मात्र, यामुळे बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोक चढतात. त्याच वेळी खलाशीही अधिक भार लोड करत असतात. या सर्व कारणांमुळे बोट बुडण्यासारख्या घटना घडत असतात. कांगोसाठी कांगो नदी ही लांबच्या प्रवासाचा एकमेव मार्ग आहे. कांगोची अर्थव्यवस्था अतिशय वाईट आहे आणि त्यामुळे सरकार पायाभूत सुविधांकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App