मुंबईत अवयवदानाच्या मोहिमेला आता येवू लागली नव्याने उभारी, महिलेमुळे मिळाले तिघांना जीवदान

विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबईत एका महिलेच्या अवयवदानातून तिघांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. महिलेचे यकृत व दोन किडन्या दान करण्यात आल्या आहेत.Organ donation increased in Mumbai once again

मुंबईत अवयवदानाच्या मोहिमेला आता उभारी येत असून गेल्या २० ऑगस्ट रोजी २४ वे अवयवदान झाले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २५ वे अवयवदान नोंदवण्यात आले आहे.

महिलेला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर, नातेवाईकांना विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या (झेडटीसीसी) समन्वयकांनी समजावल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

कोरोना साथीचा फटका मुंबईसह राज्यातील अवयवदान चळवळीलाही बसला; मात्र आता मुंबईत आतापर्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे झेडटीसीसीकडून सांगण्यात आले आहे. हे अवयवदान झेडटीसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार झाल्याचे सांगण्यात आले.

Organ donation increased in Mumbai once again

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात