मंडल 2 आणू पाहणाऱ्यांनी हे विसरू नये की आजचा भाजप 1991 चा पक्ष नव्हे!!; सुशील कुमार मोदींचा इशारा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातले हिंदुत्वाचे वातावरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यशस्वीपणे आणलेले 33% महिला आरक्षण याला काटशह देण्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधकांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पेटवायचा प्रयत्न करून देशभरात मंडल 2 चे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न चालविले आहेत opposition trying to create mandal 2 type casteist politics, but 2023 BJP will overturn it!!

या पार्श्वभूमीवर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप खासदार सुशील कुमार योगी मोदी यांनी विरोधकांना गंभीर इशारा दिला आहे मंडल 2 सारखे वातावरण आणू पाहणाऱ्या विरोधकांनी हे विसरू नये की, आजचा भाजप हा 1991 चा पक्ष नव्हे, अशा शब्दांत सुशीलकुमार मोदी यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 1991 आणि 2023 या दोन महत्त्वाच्या कालखंडात मधल्या भाजपचे वेगवेगळे वैशिष्ट्य नमूद केले. 1991 मध्ये भाजप विरोधी पक्ष म्हणून मजबूत होत होता. वेगवेगळ्या समाज घटकांचा पाठिंबा मिळायला सुरुवात झाली होती. पण 2023 मध्ये मात्र ओबीसी समाजातल्या 70 ते 80 % जनसमुदायाचा भाजपला भक्कम पाठिंबा आहे, याकडे सुशीलकुमार मोदींनी लक्ष वेधले.

10 राज्यांमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण नाही, तरी देखील भाजपची ओबीसी लोकप्रतिनिधींची संख्या इतर सर्व पक्षांच्या तुलनेत कितीतरी टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे विरोधकांनी जातनिहाय जनगणनेच्या नावाखाली मंडल 2 आणून देशातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना त्यातून कोणताही राजाकीय फायदा होणार नाही, असा स्पष्ट इशारा सुशीलकुमार मोदींनी दिला. सर्वसाधारण ओबीसींमध्ये तर भाजपचा पाठिंबा वाढतोच आहे, पण निम्नस्तरीय ओबीसींमध्ये देखील भाजप लोकप्रिय होतो आहे आणि त्या जाती जमातींमधल्या भाजपच्या लोकप्रतिनिधींची संख्याही लक्षणीय आहे, याकडे देखील सुशीलकुमार मोदी यांनी लक्ष वेधले.

त्या उलट राजीव गांधींच्या काळात काँग्रेसचा ओबीसी जनाधार मजबूत होता, तो टप्प्याटप्प्याने घटत गेला आणि आता तर तो नितीश – कुमार लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या प्रादेशिक पक्षांकडे आणि भाजपाकडे असा विभागल्याने काँग्रेसचा ओबीसी जनाधार पूर्णपणे संपुष्टात आला, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण देखील सुशीलकुमार मोदींनी नोंदविले.

देशात जातनिहाय जनगणनेच्या निमित्ताने विरोधकांनी नवीन मुद्दा शोधला पण त्या मुद्द्यातून मंडल 2 सारखे जन आंदोलन पेटवायचा त्यांचा इरादा यशस्वी होणार नाही. कारण भाजप आता 1991 चा भाजप उरलेला नाही. तो अधिक आक्रमक आणि सर्वसामान्य सर्व घटकांमध्ये मजबुतीने उभा राहिलेला पक्ष तयार झाला आहे, हे देखील सुशील कुमार मोदींनी स्पष्ट केले.

opposition trying to create mandal 2 type casteist politics, but 2023 BJP will overturn it!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात