भारत जोडो न्याय यात्रा ते निर्भय बनो आंदोलन, सगळीकडे नुसतीच बडबड; पण प्रत्यक्षात विरोधी पक्ष संघटनांनाच घरघर!!

भारत जोडो न्याय यात्रा ते निर्भयपणे आंदोलन अगदी सगळीकडे नुसतीच बडबड, पण प्रत्यक्षात विरोधी पक्षांच्या संघटनांनाच घरघर!!, अशी आजची अवस्था आहे. भारत जोडो न्याय यात्रेपासून वेगवेगळ्या लिबरल आंदोलनांपर्यंत सगळे नेते आणि कार्यकर्ते रोज पत्रकार परिषदा घेतात. कुठे ना कुठे आंदोलन करतात. मोदी सरकारवर आरोपांच्या फक्त तोंडी तोफा डागतात. लोकशाहीच्या नावाने गळा काढतात. यात शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उरलेली काँग्रेस आघाडीवर राहतात. त्यांना निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, राजू परुळेकर यांची “बौद्धिक कुमक” मिळते. त्यात आता पुन्हा एकदा उभे राहात असलेल्या शेतकरी आंदोलनाची भर पडते. Opposition parties only murmur against Modi, but fail to protect their own organisations!!

पण एवढ्या सगळ्या राजकीय उठाबशा काढताना कोणतेच विरोधी पक्ष स्वतःचे आमदार – खासदार – नगरसेवक पक्षात टिकवून धरून पक्ष संघटनेकडे लक्ष देत नाहीत, हे आजचे खरे गंभीर चित्र आहे.

राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेत एवढे मग्न आहेत की पक्षातल्या वरिष्ठ, मध्यम फळीतल्या अथवा कनिष्ठ स्तरावरच्या नेत्यांना नेमके काय हवे आहे??, आपण नेमके काय केले म्हणजे ते काँग्रेसमध्ये टिकून राहतील??, याची त्यांना पुसटशी जाणीवही नाही… आणि असली तरीही त्यांच्या प्रत्यक्ष कृतीत त्याचे प्रतिबिंब पडत नाही. अन्यथा पक्षाने सर्व काही दिलेल्या नेत्यांना पक्ष सोडावा वाटला नसता!!

पण ज्या काँग्रेस पक्षात आपले राजकीय भवितव्यच शिल्लक नाही अथवा जो पक्ष आपल्याला काही देऊही शकत नाही, कितीही संघर्ष केला, त्याग केला, तरी त्याचे उचित फळ मिळण्याची शक्यताही ज्या नेत्यांना दिसत नाही, ते नेते काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष सोडत आहेत. त्यांना भाजप या राजकीय पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायचे आहे.


आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या; राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा उत्पन्नापेक्षा खर्चच मोठा!!


पण मूळात प्रश्न हा आहे की काँग्रेस सारखा आजही राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्व टिकवून असलेला पक्ष मुख्य प्रवाहातला पक्ष का उरला नाही?? काँग्रेसचा “मुख्य प्रवाह” का आटला आणि त्याचा ओघ भाजप सारख्या पक्षाकडे का वळला?? याचा काँग्रेस किंवा काँग्रेसच्या बाजूला असलेला कोणताही पक्ष नेता विचार करत नाही… किंवा काँग्रेसच्या आणि विशेषत: राहुल गांधींच्या बाजूने बोलणारी “बौद्धिक कुमक” देखील त्यांना काही मार्गदर्शन करीत नाही.

कारण पक्ष संघटना टिकवणे, ती वाढवणे आणि त्यानंतर सत्तेची फळे चाखणे ही काँग्रेस मधली मूलभूत राजकीय प्रक्रियाच संपुष्टात आली आहे. त्या प्रक्रियेचे पुनरुज्जीवन करण्याची कोणतीही “वैचारिक मूळी” काँग्रेसकडे आज शिल्लकच नाही.

सत्तेची फळे चाखायचे सुरुवातीचे धडे

त्या उलट भाजप सुरुवातीपासून संघटनेकडे आणि नंतर सत्तेच्या वापराकडे नीट लक्ष देत असल्यामुळे सत्तेची फळे कशी चाखायची याचे सुरुवातीचे धडे त्यांना सध्या मिळत आहेत. सत्तेच्या वापरातून इतर पक्ष भाजप फोडतो हा आरोप करणे सोपे आहे, पण आपल्या पक्षातून नेते जातातच का?? याचा आरोपांपलीकडे जाऊन विचार करण्याची खरी गरज आहे. नेते पक्षाबाहेर जाऊच नये म्हणून त्यांना अटकाव करणे क्रमप्राप्त आहे. पण हे कठीण काम काँग्रेसच्या हायकमांडला जमत नाही, हे खरे काँग्रेसचे राजकीय दुखणे आहे. काँग्रेसची ही अवस्था पक्षाच्या हायकमांडच्या दुर्बल राजकीय समजातूनच आली आहे.

प्रणवदांचे परखड निरीक्षण

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या डायरीतल्या नोंदीत नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवले आहे. राहुल गांधींकडे गांधी परिवाराचा उद्दामपणा आला आहे, पण नेहरू गांधी परिवाराचे राजकीय ज्ञान आणि आकलन आलेले नाही, हे प्रणव मुखर्जींचे निरीक्षण आजच्या काँग्रेस जणांना कितीही कटू वाटले तरी ते सत्य आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते बाहेर पडून पक्ष फुटण्यासाठी भाजपचे नेते कारणीभूत आहेत असे खरे मानले, तरी प्रत्यक्षात नेते फुटून बाहेर पडणे हा परिणाम आहे. त्याची मूलभूत कारणे काँग्रेसच्या हायकमांडच्या बौद्धिक आणि कर्तृत्वाच्या अक्षमतेत आहेत!!

Opposition parties only murmur against Modi, but fail to protect their own organisations!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात