आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक
विशेष प्रतिनिधी
पाटणा : Sambhal Shahi Jama Masjid उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण रविवारी (२४ नोव्हेंबर) पुन्हा सुरू झाले, दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत सर्वेक्षण केले जात होते. दरम्यान, या सर्वेक्षणाला विरोध सुरू झाल्याने आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाने मशिदीबाहेर पोलिसांवर दगडफेक केली, पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतले.Sambhal Shahi Jama Masjid
आंदोलकांच्या या गदारोळानंतर मशिदीचे सर्वेक्षण थांबवण्यात आले असून आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या आहेत. यासोबतच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला आहे. मशिदीच्या आत सर्वेक्षण सुरू असताना मशिदीबाहेर उभ्या असलेल्या जमावाने पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली.
पाहणीसाठीचे पथक साडेसात वाजता मशिदीत पोहोचले होते, काही वेळाने जमाव आला आणि घोषणाबाजी सुरू झाली. यानंतर टीमने त्यांना समजावून सांगितले आणि नंतर आत गेले. यानंतर जमावाने पुन्हा आवाज करत दगडफेक सुरू केली. त्यानंतर मशीद कमिटी टीम आणि पोलिसांनी लोकांना समजावून सांगितले आणि सूचनाही दिल्या. काही तरुण दोन रस्त्यांवर आले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. सध्या मशिदीबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन यांनी मशीद हे मंदिर असल्याचा दावा करत संभलच्या दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, 19 नोव्हेंबर रोजी स्थानिक पोलिस आणि मशिदीच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत अशाच प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले. हिंदू पक्षाने न्यायालयाला हे हरिहर मंदिर असल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना संभल मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App