वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत जरी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधायला आल्या असल्या तरी त्यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट फक्त सौजन्य भेट होती. यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही, असे ममता बॅनर्जी यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.Only Kovid and Bengal renaming discussed during PM Modi’s visit: Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील कोविड परिस्थिती आणि राज्याच्या नामांतराचा विषय आपण पंतप्रधानांची झालेल्या चर्चेत उपस्थित केल्याचे त्या म्हणाल्या. पश्चिम बंगालला कोविड प्रतिबंधक लसी ज्यादा देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली.
West Bengal CM Mamata Banerjee met Prime Minister Narendra Modi in Delhi today pic.twitter.com/zRKIGgoLfT — ANI (@ANI) July 27, 2021
West Bengal CM Mamata Banerjee met Prime Minister Narendra Modi in Delhi today pic.twitter.com/zRKIGgoLfT
— ANI (@ANI) July 27, 2021
पश्चिम बंगाल या राज्याचे “बांगला” असे नामांतर करण्याचा ठराव गेल्याच विधानसभेत करण्यात आला होता. परंतु केंद्र सरकारच्या मंजुरीविना तो अडलेला आहे. केंद्र सरकारने या नामांतरास लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांकडे केली. पंतप्रधानांनी त्यावर विचार करू,असे आश्वासन दिल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. याखेरीज कोणतीही माहिती ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना दिली नाही
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App