वृत्तसंस्था
श्रीनगर : काश्मीर मध्ये गेल्या काही दिवसात काश्मीर पंडित यांच्या हत्या वाढल्यानंतर माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी एक विषारी तर्कट लढवले आहे. “द काश्मीर फाईल्स” सिनेमावर बंदी घाला, तरच काश्मिरी पंडितांच्या हत्या थांबतील असे चिथावणीखोर वक्तव्य डॉक्टर अब्दुल्ला यांनी केले आहे. Only if cinema is banned will the killings of Kashmiri Pandits stop
“द काश्मीर फाईल्स” या सिनेमामुळे देशात द्वेष निर्माण होत आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर सरकारने या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. यावेळी फारूक अब्दुल्ला यांनी या चित्रपटातील एका दृष्यावर आक्षेपही घेतला आहे. एक मुस्लीम व्यक्ती हिंदूची हत्या करून त्याचे रक्त तांदळात टाकतो आणि पत्नीला खा म्हणतो असे होऊ शकते का? असा सवालही त्यांनी केला आहे.
“द काश्मीर फाईल्स” मुळेच काश्मिरमधील मुस्लिम युवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या सिनेमामुळे मुसलमान विरुद्ध देशात विद्वेष पसरतो आहे आणि त्याचेच परिणाम काश्मिरी पंडित आणि वरच्या हल्ल्यात होत आहे असा चिथावणीखोर दावा डॉ. अब्दुल्ला यांनी केला आहे. मागील काही दिवसांमध्ये काश्मीर पंडितांवरील हल्ल्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यानंतर काश्मिरी पंडितांच्या घरांबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
लष्कर ए इस्लामची काश्मिरी पंडितांना धमकी
काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडण्यास सांगितले आहे. तसे केले नाही तर मरण्यास तयार रहा, अशी धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. ज्या काश्मिरी पंडितांना काश्मीरच्या रुपात आणखी एक इस्राईल हवे आहे आणि काश्मीरमधील मुस्लिमांना मारायचे आहे त्यांच्यासाठी येथे कोणतीही जागा नाही. तुमची सुरक्षा कितीही कडक करा, तुमचे “टार्गेट किलिंग” होईल, अशी धमकी देण्यात लष्कर ए इस्लामने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App