विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिकण्यासाठी वय नसते असे म्हणतात हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी दाखवून दिले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी चोटाला यांनी दहावीची इंग्रजी विषयाची परीक्षा दिली. सिरसा येथील आर्य कन्या वरिष्ठ माध्यमिक शाळेत त्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.Only 86 years old, still the former Chief Minister of Haryana passed the matriculation examination
ओमप्रकाश चौटाला यांनी गतवर्षी हरियाणा ओपन बोर्डाकडून बारावीची परीक्षा दिली होती. पण त्यांनी दहावीची इंग्रजीची परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याने ५ ऑगस्टला निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आपला बारावीचा निकाल मिळवण्यासाठीच चौटाला दहावीच्या परीक्षेसाठी पोहोचले होते.
परीक्षा केंद्रावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी विद्यार्थी आहे, नो कमेंट्स म्हणत काही बोलणं टाळलं. यावेळी त्यांनी कोणतंही राजकीय भाष्य टाळलं. यानंतर ८६ वर्षीय ओमप्रकाश चौटाला परीक्षा देण्यासाठी गेले.
दरम्यान याआधी चौटाला यांनी शिक्षण विभागाकडे पेपर लिहिण्यासाठी लेखकाची मागणी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली होती. दोन तासात चौटाला यांनी पेपर पूर्ण केला. जेबीटी घोटाळ्याची शिक्षा भोग असताना २०१३ ते २०२१ दरम्यान चौटाला यांनी तिहार जेलमध्ये दहावीच्या परीक्षेचा अभ्यास केला होता.
२०१७ मध्ये त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलमधून उर्दू, सायन्स, सोशल स्टडीज आणि इंडियन कल्चर अॅण्ड हेरिटेज विषयांमध्ये ५३,४ टक्के गुण मिळवले होते. चौटाला हे माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे चिरंजीव आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more