15 ऑगस्टपर्यंत काही शहरांमध्ये कांद्याचे भाव 100 रुपयांच्या पुढे जातील, असे जाणकारांचे मत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : साधारणपणे दरवर्षी पावसाळ्यात भाज्या महाग होतात. पण यावेळी त्याचा परिणाम जास्त होता. गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे (tomato)भाव गगनाला भिडले होते. सरकारच्या हस्तक्षेपानंतर टोमॅटोच्या भावातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता कांद्याने बजेट बिघडवले आहे. 20 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या कांद्याचा(Onion) दर 80 रुपयांवर पोहोचला आहे. तर कांद्याशिवाय कोणत्याही भाजीची चव अपूर्ण असते. एवढेच नाही तर बाजारातील जाणकारांच्या मते 15 ऑगस्टपर्यंत कांद्याचे भाव 100चा टप्पा ओलांडतील. याशिवाय हिरवी मिरची, कोथिंबीर आदींचे भावही उच्चांकी पोहोचले आहेत.
टोमॅटोप्रमाणेच कांदाही पावसाळ्यात खराब होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय बाजारात त्याची आवकही कमी झाली आहे. ही महागाई ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरपर्यंत कायम राहू शकते. त्यानंतर भाजीपाला मूळ दरावर येण्यास सुरुवात होईल. 15 ऑगस्टपर्यंत काही शहरांमध्ये कांद्याचे भाव 100 रुपयांच्या पुढे जातील, असे जाणकारांचे मत आहे. भाजी मार्केट तज्ज्ञ नवीन सैनी सांगतात की, दरवर्षी पावसाळ्यात भाज्यांचे भाव महागतात. मात्र यावेळी प्रचंड महागाई झाली आहे. याचे थेट कारण म्हणजे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी होणे, कारण पावसाळ्यात भाजीपाला जास्त काळ सुरक्षित राहत नाही.
गेल्या एका महिन्यात काही शहरांमध्ये कांद्याचे भाव 225 टक्क्यांनी वाढले आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या साइटनुसार, मंगळवारी दिल्लीसह पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेले दिसले. किरकोळ बाजाराबाबत बोलायचे झाले तर दिल्लीच्या गाझीपूर मंडईत कांदा 80 रुपये किलोने विकला जात होता, त्याचवेळी दिल्लीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या मेरठमध्ये कांद्याचा भाव 80 ते 90 रुपये किलो होता. कांद्याच्या भावात ही अचानक वाढ झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App