टेक जायंट अर्थांत तंत्रज्ञानातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सर्व्हिसमधील त्रुटीमुळे शुक्रवारी संपूर्ण जग ‘गोठले’ होते. मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर अवलंबून असलेल्या जगभरातील 95% संगणकांनी काम करणे बंद केले. भारतासह अनेक देशांमध्ये 2 हजारांहून अधिक उड्डाणे रद्द झाली. विमानतळावर मॅन्युअली म्हणजे चक्क हाताने काम करावे लागत होते. या संकटामुळे रेल्वे आणि मेट्रो सेवा प्रभावित झाल्याने आयटी इतिहासात सर्वात मोठी त्रुटी झाल्याचे दिसून आले. One Microsoft update just crashed the world, what’s next? Read in detail
शुक्रवारी सकाळी 11 वाजता या संकटाला सुरुवात झाली. मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरसाठी सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या क्राऊडस्ट्राइकने अँटिव्हायरस अपडेट केले. या अपडेटनंतर लगेचच विंडोज वापरकर्त्यांचे संगणक एकतर बंद झाले किंवा ते रिस्टार्ट झाले. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, लगेच तोडगा काढू. पण भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इंग्लंडमधील एअरलाइन्स, बँकिंग आणि एटीएम कंपन्यांच्या कामकाजावर याचा गंभीर परिणाम झाला. ब्रिटनमध्ये तर टीव्ही वाहिन्यांचे प्रसारण थांबण्याची नामुष्की ओढवली.
संगणकात नेमकी काय अडचण होती?
संपूर्ण जगात विंडोज-10 वापरकर्त्यांचे संगणक एकतर बंद झाले किंवा रिस्टार्ट झाले. जेव्हा सिस्टिम क्रॅश होते तेव्हा हे घडते. संगणक आपोआप रिस्टार्ट होऊ लागतो आणि डेटा गमावण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
क्राऊड स्ट्राइक सॉफ्टवेअरचा वापर विंडोज आधारित संगणकांना सायबर हल्ले आणि व्हायरसपासून संरक्षणासाठी केला जातो. त्याने गुरुवारी रात्री एक अपडेट जारी केले. ज्या संगणकांनी हे अपडेट घेतले तेच क्रॅश होऊ लागले.
कंपनीने यावर काय केले?
क्राऊड स्ट्राइकने त्यांच्या वेबसाइटवरून अपडेट काढून टाकले. ज्या संगणकांवर ते इन्स्टॉल झाले ते मात्र पुन्हा कसे रिस्टोअर होणार, याबाबत काहीही स्पष्टता नाही. रिमोट ॲक्सेसद्वारे सुधारणा करण्याचे मोठे आव्हान आहे. हे सर्व मॅन्युअली करण्यास प्रचंड वेळ लागेल. तोपर्यंत त्रास सुरूच राहणार आहे.
सुदैवाने डिजिटल पेमेंटवर त्रासापासून मुक्त
विमान कंपन्यांना उड्डाणे रद्द करावी लागली किंवा वेळापत्रक नव्याने द्यावे लागले. इंडिगोच्या 192 विमानांसह 200 उड्डाणे रद्द झाली. मॅन्युअल प्रक्रियेमुळे डझनभर उड्डाणांना विलंब झाला. मुंबईतून 9, पुण्यातून 39 विमाने (शुक्रवारची 15, शनिवारची 24) रद्द झाली.
भारतातून नियोजित 3,625 पैकी 56 उड्डाणे रद्द झाली
एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, इंडिगो, अकासा, स्पाइस जेट, विस्ताराने म्हटले, त्यांनाही अडचणी आल्या आहेत. यावर तोडगा म्हणून त्यांनी हाताने लिहिलेल्या बोर्डिंग पास प्रवाशांना दिल्या. एका प्रवाशाला चेक-इन करण्यासाठी 30-40 मिनिटे लागली. चेन्नई ते दिल्ली या प्रवासात विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नीट माहिती न दिल्याने प्रवासी त्यांना भांडताना दिसले. स्पाइसजेटने रात्री उशिरा माहिती दिली की, त्यांची अडचण पूर्णपणे दूर झाली आहे.
दुसरीकडे, आरबीआय, एसबीआय, एचडीएफसी, ॲक्सिस व आयसीआयसीआय बँकेतही सामान्यपणे कामकाज पार पडले. इतर बँका व एनबीएफसीवर किरकोळ परिणाम झाल्याचे वृत्त आहे. स्टॉक एक्स्चेंज एनएसई व बीएसईमध्ये सामान्यपणे काम झाले, परंतु मोतीलाल ओसवाल, एंजल ब्रोकिंगसह अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी समस्या नोंदवल्या. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, आम्ही मायक्रोसॉफ्टच्या संपर्कात आहोत.
आता पुढे काय होणार?
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले, ‘क्राउडस्ट्राइकसोबत मिळून काम करत आहोत. लवकरच अडचण दूर केली जाईल. सर्व गोष्टी पुन्हा ऑनलाइन होतील. तर आयटी एक्स्पर्ट म्हणाले, जगभरातील कॉम्प्युटर सेवा पूर्णपणे रुळावर येण्यास अजून काही दिवस लागू शकतात.
जगातील सर्वात मोठे आयटी संकट म्हणून नोंद
अपडेटमुळे स्क्रीनवर निळ्या बॅकग्राऊंडसह मेसेज येतो. याला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर म्हणतात. अमेरिकेतील 3 मोठ्या एअरलाइन्सची सर्व उड्डाणे रद्द झाली होती. ब्रिटनमध्ये हीथ्रो, गॅटविक आणि एडिनबर्ग विमानतळ बंद करावे लागले. कोविडनंतर पहिल्यांदाच असे घडले. रात्री ऑपरेशन सुरू झाले. न्यूयॉर्क ते लंडनपर्यंत डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स नव्हत्या. शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. आपत्कालीन सेवांवर 4000 कॉल आले. लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्येही कामावर परिणाम झाला. मर्सिडीझ बेंझ, मॅकडोनाल्ड, स्काय न्यूज, व्हिसा यांच्या सेवा प्रभावित झाल्या. अमेरिका आणि ब्रिटनमधील स्टोअरमध्ये डिजिटल पेमेंट नसल्यामुळे व्यवहार रोखीने करावे लागले. टेस्लाला अमेरिकेतील उत्पादन थांबवावे लागले.
मायक्रोसॉफ्टकडे अशा संकटांसाठी कोणताही‘प्लॅन बी’ नव्हता. ते स्वतः सायबर सिक्युरिटी फर्म त्रुटी दूर करण्याची वाट पाहत राहिले. ही अत्यंत धोकादायक स्थिती होती. आर्थिक प्रणालीचे महत्त्वपूर्ण घटक मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिमवर जास्त अवलंबून असतात. तथापि, यालाही पर्याय आहेत. अनेक कंपन्या ‘लिनक्स’ आणि ‘मॅक’ वापरतात. पण एअरलाइन्स आणि इतर उद्योगांनी असे गृहीत धरले की मायक्रोसॉफ्टमध्ये काहीच चुकीचे घडू शकत नाही. देशात पर्यायी कार्यप्रणालीचा विकास गांभीर्याने करण्याची वेळ आता आली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि यूपीआयसारख्या प्रणालीची स्थापना ही भारताची क्षमता दर्शवते. 95% संगणक मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात. आता साहजिकच जगभरात यावर पर्याय शोधण्यावर भर दिला जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App