कोलकात्यात एक लाख जण एकत्रित गीता पठण करणार; पंतप्रधान मोदींनी लिहिला ‘हा’ खास संदेश!

ज्याला बंगालीमध्ये ‘लोकखो कंठे गीता पथ’ असे नाव देण्यात आले आहे.


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : येथील ब्रिगेड परेड मैदानाव आज (रविवार) एक लाखाहून अधिक लोक एकत्र गीताचे पठण करतील. या पार्श्वभूमीवर मोदींनी जनतेसाठी खास संदेश लिहिला आहे. गीता जयंतीनिमित्त गीतेचे सामूहिक पठण करायचे आहे. ज्याला बंगालीमध्ये ‘लोकखो कंठे गीता पथ’ असे नाव देण्यात आले आहेOne lakh people will recite the Gita together in Kolkata Prime Minister Modi wrote special message

पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, पंतप्रधानांनी या कार्यक्रमाचे कौतुक करणारा विशेष संदेश जारी केला आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विशेष संदेशात लिहिले की, कोलकाता येथील परेड ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेला ‘लोखो कोठे गीतार पाठ’ हा कार्यक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. हे सनातन संस्कृती संसद, मतिलाल भारत तीर्थ सेवा मिशन आश्रम आणि अखिल भारतीय संस्कृत परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जात आहे. संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपला सांस्कृतिक वारसा परंपरा, ज्ञान, तत्त्वज्ञान-आध्यात्मिक बुद्धिमत्ता, समावेशन, सांस्कृतिक विविधता आणि सुसंवाद यांचे हे मिश्रण आहे.

लोकांना संबोधित केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, श्रीमद भगवत गीता महाभारत काळापासून आपल्या स्वातंत्र्यापर्यंत आणि आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे. गीता आपल्याला अर्थपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग दाखवते आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासही शिकवते.

One lakh people will recite the Gita together in Kolkata Prime Minister Modi wrote special message

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात