विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : कर्नाटकातील हिजाब वादावरून पाकिस्तान भारताला शहाणपणाला शिकवित आहे. मात्र, त्याच पाकिस्तानातात धर्मांधांनी पवित्र कुराणचा अपमान केल्याचा आरोप करत एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. जमावाने त्या व्यक्तीला झाडाला लटकवले आणि त्याच्यावर दगडफेक सुरू केली.One killed in Pakistan for insulting Quran
यादरम्यान तो स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा करणाºया लोकांकडून मदत मागत राहिला, पण कोणीही त्याचे एकूण घेतले नाही. तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडफेक करण्यात आली.हे प्रकरण पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील खानवाल जिल्ह्यातील एका गावातील आहे.
येथे नमाजासाठी लोक जमले होते, तेव्हा एका व्यक्तीने कुराणची काही पाने फाडली आणि त्यांना आग लावली,असा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी त्या व्यक्तीवर हल्ला केला. कुराणचा अपमान केल्याचा राग आलेल्या लोकांनी आधी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली, नंतर झाडाला लटकवले.
घटनास्थळी जमलेल्या जमावाने आरोपींवर दगडफेक सुरू केली. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी सांगितले की, दगडफेक होण्यापूर्वीच पोलिस तेथे पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले, मात्र जमावाने त्याला पोलिस ठाण्यातच पकडले.
या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारवर टीकेची झोड उठली आहे. प्रांत सरकारने यावर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री उस्मान बजदार यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.पाकिस्तानमध्ये धार्मिक अपमानाच्या नावाखाली मॉब लिंचिंगचे प्रमाण वाढत आहे. 1947 ते 2021 या काळात 18 महिला आणि 71 पुरुषांची धर्म किंवा धर्मग्रंथाचा अपमान केल्याबद्दल हत्या करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App