विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात दररोज एक कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यासाठी सरकार एकूण 28 कोटी लसी खरेदी करणार आहे. या लसी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांकडून खरेदी केल्या जाणार आहेत. याशिवाय बायोलॉजिकल-ई आणि झायडस कँडिला या कंपन्यांच्या लसीदेखील भारतात उपलब्ध होणार आहेत.One crore people will be vaccinated every day in October, the government will buy 28 crore vaccines
देशात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा 15 ऑक्टोबरपूर्वी पार करण्याचा सरकारचा मानस आहे. सध्याच्या लसीकरणाच्या वेगानुसार हा टप्पा 10 ते 12 आॅक्टोबरदरम्यानच पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर देशात फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोविड वॉरियर्स यांच्या सन्मानार्थ जंगी सोहळा आयोजित केला जाणार आहे.
देशात आतापर्यंत 88 कोटीपेक्षा जास्त लसीकरण पूर्ण झालं आहे. 18 सप्टेंबर या दिवशी भारतात 2.5 कोटी कोरोना लसी देण्यात आल्या होत्या. आतापर्यंतचा हा विश्वविक्रम आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील 94 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल, असा अंदाज सरकारमधील सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.
देशातील 94 कोटी नागरिकांना 188 कोटी डोस उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती एका अधिकाºयाने दिली आहे. भारतात गेल्या महिन्यात 23 कोटी जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. आतापर्यंतचा हा जगातील विक्रम मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App