काबूल विमानतळावर दोन दिवसांत पुन्हा दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याने खळबळ

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : काबूल विमानतळावर एक ते दोन दिवसांत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला शक्य असल्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. काबूलमधील अमेरिकी नागरिकांनी विमानतळ परिसरात थांबून न राहता सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा, असा सल्ला सरकारने दिला आहे. यामुळे देशात खळबळ उडाली आहे. Once again alert for airport attack on Kabul

बायडेन म्हणाले की, ‘विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. येत्या एक ते दोन दिवसांतच हा हल्ला होणार असल्याचे आमच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे.



काबूल विमानतळावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या नागरिकांना माघारी नेण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. ही मोहिम आता अंतिम टप्प्यात आली असताना विमानतळावर आणखी एक हल्ला होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचे अमेरिकेच्या गृह विभागाने म्हटले आहे.

काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्यात १७० अफगाणी नागरिकांबरोबरच १३ अमेरिकी सैनिकांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांवर हल्ले सुरुच ठेवणार असल्याचेही बायडेन यांनी स्पष्ट केले.

Once again alert for airport attack on Kabul

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात