काँग्रेसचे चिंतन : एकीकडे राष्ट्रवादीचा धोका; तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नव्यांना मोका!!


काँग्रेसने उदयपुरमध्ये केलेले चिंतन शिबिराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. काँग्रेसने एकीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उदयपूर मधून आल्यानंतर राष्ट्रवादी विरोधात फैरी झाडायला सुरुवात केली आहे. उदयपुर मधल्या चिंतन शिबिराने त्यांचात जोश भरला आहे. राष्ट्रवादीचे राजकीय वस्त्रहरण करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. On the one hand, the threat of the NCP; On the other hand, give a chance to newcomers in Maharashtra Congress

दुसरी काँग्रेस अंतर्गत संघटनात्मक बदल अपरिहार्य होऊन जुन्यांना धोका आणि नव्यांना मोका अशी स्थिती जवळ आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 5 वर्षे पदावर राहिलेल्या जिल्हाध्यक्षांना पायउतार व्हावे लागणार आहे. अर्थात नव्यांना देखील संधी मिळणार आहे.

काँग्रेससाठी एकाच वेळी हा धोकाही आहे आणि मोका आहे. कारण जुने पदाधिकारी जर पदावरून काढले तर ते राष्ट्रवादीत जाण्याचा धोका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर जागोजागी नामोहरम करण्यासाठी टपली आहे. त्यात काँग्रेसचे जुने पदाधिकारी बाजूला करून नव्यांना संधी दिली तर जुने पदाधिकारी नाराज होऊन राष्ट्रवादीचा रस्ता धरण्याची शक्यता आहे. पण तरी देखील काँग्रेससाठी हा राजकीय सौदा फायदेमंद राहण्याची सुद्धा शक्यता आहे.महाराष्ट्रातील जुने पदाधिकारी बाजूला केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला तरी काँग्रेसला नव्यांच्या मार्फत खऱ्या अर्थाने सर्व बांधणी करता येण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना काँग्रेस हायकमांडला हेच तर अपेक्षित आहे. कारण जुन्यांची पक्ष वाढवण्याची ताकद अजमावली आहे. पक्ष आधीच रसातळाला गेला असल्याने जुन्या पदाधिकाऱ्यांचे राजकीय कर्तृत्व होते “सिद्ध” झाले आहे. त्यामुळेच ते इतरत्र गेल्याने काँग्रेसला देखील फारसा फरक पडणार नाही ही राजकीय वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इकडे राष्ट्रवादीचा धोका असून देखील दुसरीकडे काँग्रेस साठी धोक्यापेक्षा पक्ष वाढवण्याची संधी मोठी आहे हा घटक जास्त महत्त्वाचा आहे.

– शिबिरातील ठरावाने प्रदेश काँग्रेसचे निम्मे पदाधिकारी पायउतार?

राज्यात सुमारे २५ हून अधिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष 5 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहे, त्यांनाही पदे रिक्त करून द्यावी लागतील.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बदलले की कार्यकारिणीही बदलली जाते. त्यानुसार सहा महिन्यांनंतर नवीन प्रदेश पदाधिकारी व कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षांसह २७१ पदधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात काँग्रेसचे ६० जिल्हाध्यक्ष आहेत.

पक्षसंघटनेत नव्यांना संधी देत असताना ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेले ५० % पदाधिकारी निवडावेत, असेही या ठरावात म्हटले आहे. हा नियम पुढे लोकसभा, विधानसभा, विधान परिषद व इतर निवडणुकांमध्ये उमेदवारी देतानाही विचारात घ्यावा लागेल.

पदाधिकारी निवडताना दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला यांना योग्य प्रतिनिधित्व देऊन संघटनेत सामाजिक समतोल साधण्याबाबत खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. या ठरावानुसार राज्यात ब्लॉक, तालुका, जिल्हा व प्रदेश स्तरावर मोठय़ा प्रमाणावर संघटनात्मक बदल करावे लागणार आहेत.

उदयपुर चिंतन शिबीर असे ठराव तसे अमलात आणले तर काँग्रेससाठी यशाची 100 % खात्री आहे. पण टक्केवारीच्या हिशेबात 50 % पेक्षा जास्त जरी अमलात आणले तरीही काँग्रेससाठी हा सौदा देखील फायदेमंद राहील. कारण जेवढ्या प्रमाणात पदाधिकारी बदल होईल तेवढ्या प्रमाणात पक्षात हालचाली वाढून पक्षसंघटनेत बळकटीस सुरुवात होण्याची शक्यता आहे

On the one hand, the threat of the NCP; On the other hand, give a chance to newcomers in Maharashtra Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात