वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एकीकडे महागाईने एप्रिलमध्ये ७.७९ टक्के हा 8 वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला असला तरी दुसरीकडे देशात मान्सूनचे आगमन आठवडाभर आधीच होणार असल्याच्या बातम्यांमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. 15 मे रोजी अंदमानात पोहोचणारा मान्सून केरळमध्ये आठवडाभर आधीच पोहोचणार असल्याच्या बातम्या आहेत. हवामान खात्याने अधिकृतरित्या याचा अंदाज व्यक्त केला आहे. On the one hand, high inflation; On the other hand, monsoon should be sprinkled for a week already
– उच्चांकी महागाई
अन्नधान्याच्या किमतींतील भडक्यामुळे महागाई दराने ही चिंताजनक पातळी गाठली. महागाई दर सलग चौथ्या महिन्यात रिझव्र्ह बँकेसाठी सहनशील पातळीच्या तुलनेत अधिक राहिला आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सरलेल्या मार्चमध्ये १७ महिन्यांचे उच्चांकपद गाठत ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ६.९५ टक्क्यांवर गेला होता. हा दर चालू वर्षांत जानेवारीपासूनच ६ टक्क्यांच्या वर राहिला आहे.
– महागाईचा ताण राहणार
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या आठवडय़ात रेपो दर आणि रोख राखीव प्रमाणात वाढ करताना, वर्तमान स्थितीवर भाष्य केले. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात भडकलेल्या महागाईवर अंकुश लावण्यास प्राधान्यक्रम म्हणून व्याजदर वाढीचे पाऊल टाकावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एप्रिलमध्ये आणि पुढील काळात वाढत्या महागाईचा ताण कायम राहण्याचाही त्यांनी कयास व्यक्त केला होता.
देशातील औद्योगिक उत्पादनाने सरलेल्या मार्च २०२२ मध्ये १.९ टक्क्यांची वाढ दर्शविली. सुटय़ा घटकांच्या किमती गगनाला भिडूनही नोंदवण्यात आलेली ही वाढ दिलासादायक मानली जाते. २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी औद्योगिक उत्पादन दर ११.३ टक्के नोंदविण्यात आला आहे.
– मान्सूनचे लवकर आगमन
अंदमान आणि केरळमध्ये मान्सूनचे आगमन होत आहे. वाऱ्याचा वेग, अनुकूल दिशा आणि अनुकूल वातावरण यामुळे मान्सून अंदमानात 15 मे पर्यंत पोहोचेल. तेथे काही काळ स्थिरावेल आणि नंतर तो केरळकडे सरकून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्हाची काहिली आणि महागाईच्या झळा या पार्श्वभूमीवर मान्सूनचे आठवडाभर आधी आगमन सर्वसामान्यांना दिलासा देऊन जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App