प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला आज 20 नोव्हेंबर 2022 हा शेवटचा दिवस आहे. मात्र, या शेवटच्या दिवशी देखील काँग्रेससाठी सावरकरांचाच मुद्दा अडचणीचा राहिला. असे असून देखील काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर भाजपला पुन्हा एकदा डिवचले. “जिस दिन हमारे नेताओं के बारे मे भाजपा नेता झूठ बोलना बंद कर देंगे, उसी दिन से हम लोग उनके नेताओं के बारे मे सच बोलना बंद करेंगे, अशा शब्दात जयराम रमेश यांनी भाजप, शिवसेना, मनसे या पक्षांच्या नेत्यांना डिवचले. On the last day of Rahulji’s Bharat Jodo Yatra in Maharashtra, Jairam Ramesh again discussed the issue of Savarkar.
जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यात्रेचे महाराष्ट्रातील संयोजक बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. यामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या मुद्द्यापासून ते सावरकरांच्या मुद्द्यापर्यंत सर्व मुद्दे आले. त्यातही बाळासाहेब थोरात आणि नाना पाटोळे यांनी सुरुवातीला राहुलजींच्या भारत जोडो यात्रेला टीआरपी मिळाला नसल्याची कबुली दिली. त्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा विनयभंगाचा आणि नंतरच्या राजीनाम्याचा मुद्दा कारणीभूत ठरल्याचे हे दोन्ही नेते म्हणाले. नंतर मात्र राहुलजींच्या भारत जोडो यात्रेला मीडियाने चांगला प्रतिसाद दिला. त्यांची शेगावची सभा तर विक्रमी ठरली. त्यालाही उत्तम प्रतिसाद लाभला, असे आवर्जून नमूद केले.
परंतु या पत्रकार परिषदेत जयराम रमेश बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचे निवेदन संपल्यानंतर पत्रकारांनी सावरकरांच्याच मुद्द्यावर प्रश्न विचारले. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या सावरकरांच्या सर्व मुद्द्यांचे समर्थन केले. सावरकरांनी माफी मागितली. त्यांना ब्रिटिशांनी 60 रुपये पेन्शन दिली, वगैरे मुद्दे त्यांनी पुन्हा उपस्थित केले.
त्याचवेळी जयराम रमेश यांनी हस्तक्षेप करून कृपया भारत जोडो यात्रेवर प्रश्न विचारा, असे सांगत स्वतः सावरकरांच्याच मुद्द्याला पुन्हा हवा दिली. जयराम रमेश म्हणाले, की “ज्या दिवशी भाजपचे नेते आमच्या नेत्यांविषयी खोटे बोलणे बंद करतील, त्या दिवसापासून आम्ही त्यांच्या नेत्यांविषयी खरे बोलणे बंद करू.” या वक्तव्यातूनच जयराम रमेश यांनी भाजप शिवसेना मनसे या पक्षाच्या नेत्यांना भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या दिवशी देखील डिवचले.
नाना पटोले यांचे गडकरींवर शरसंधान
नाना पटोले यांनी राज्यपालांवर शरसंधान साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर देखील तीव्र आक्षेप नोंदविला. ज्या गडकरींना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून दूर केले, त्या गडकरींची तुलना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांची केली. या राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवलेच पाहिजे, अशी मागणी आम्ही राष्ट्रपतींकडे करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
पण पत्रकार परिषद घोळून घोळून सावरकरांच्याच मुद्द्यावर येत होती. त्यामुळे जयराम रमेश यांनी अखेरीस हस्तक्षेप करून सावरकरांवरचे प्रश्न बंद करा, असे सांगून खरे बोलणे आणि खोटे बोलणे हा शाब्दिक खेळ केला. “जिस दिन भाजप के नेता हमारे नेताओं के बारे मे झूट बोलना बंद कर देंगे, उसी दिन से हम उनके नेताओं के बारे मे सच बोलना बंद कर देंगे,” असे सांगून जयराम रमेश यांनी सावरकरांचा अपमानाचा मुद्दा पुन्हा जिवंत ठेवला. राहुल गांधींची भारत जवळ यात्रा महाराष्ट्रातील मध्य प्रदेशाकडे जाणार आहे. तेथे कोणता मुद्दा गाजतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App