लोकसभा निवडणूक 2024 : एकीकडे भाजपचे महाराष्ट्रात मिशन 16; दुसरीकडे काँग्रेसच्या हक्काची जागा खेचण्याची राष्ट्रवादीची तयारी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : 2023 नववर्षाच्या सुरुवातीलाच राजकीय आखाड्यात लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे भाजपने महाराष्ट्रात मिशन 16 आखले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसच्या हक्काची जागा खेचून घेण्याची तयारी चालविली आहे. On one hand BJP’s Mission 16 in Maharashtra; On the other hand, NCP is ready to take the rightful place of Congress

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते चंद्रपूर आणि संभाजीनगर मध्ये जाहीर सभा घेणार आहेत. भाजपने आखलेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या मिशन 144 आणि महाराष्ट्रातल्या मिशन 16 चा हा प्रारंभ मानला जात आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपने ज्या जागा गमावल्या किंवा भाजपने च्या लोकसभेच्या जागा कधीही जिंकल्या नाहीत, अशा देशा पातळीवरच्या 144 जागा आणि महाराष्ट्रातल्या 16 जागा भाजपकडे खेचून आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातही महाराष्ट्रात बारामती सारख्या मतदारसंघांवर भाजपने कॉन्सन्ट्रेट केले आहे. चंद्रपूरची जागा भाजपने गमावली होती. अशा महाराष्ट्रातल्या 16 जागा आहेत, ज्यावर सध्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे खासदार आहेत. हे खासदार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना – भाजप युतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आले होते. परंतु 2019 मध्ये शिवसेना फुटून महाविकास आघाडीत गेली.


J. P. Nadda : काँग्रेस ना राष्ट्रीय, ना भारतीय उरलीय फक्त “भाई बहन की पार्टी”!!; भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचा हल्लाबोल


त्यामुळे शिवसेनेचे हे खासदार महाविकास आघाडीत गेले. आता शिवसेनेतही फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. मिशन 16 हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक केंद्रीय मंत्राकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशिष्ट मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. त्यामध्ये बारामती मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली आहे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्रातील मिशन 16 आणि राष्ट्रीय पातळीवरच्या मिशन 144 ची सुरुवात करत आहेत.

एकीकडे भाजपने आपल्या मोठ्या मिशनवर संपूर्ण ताकद लावून तयारी सुरू केली असताना महाराष्ट्रात दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र काँग्रेसच्या हक्काच्या जागा आपल्याकडे खेचून घेण्याची तयारी चालवली आहे. सोलापूर मतदारसंघ परंपरागत दृष्ट्या शिवसेना-भाजप युतीत भाजपकडे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेसकडे असतो. मात्र, सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचा खासदार व्हावा, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर मध्ये आमदार आणि खासदार बदलावेत, असे सूचक वक्तव्य करून त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनाच एक प्रकारे डिवचले आहे. कारण सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचे वर्चस्व आहे. सुशीलकुमार शिंदे हे शरद पवारांचे घट्ट मित्र पण राजकीय विरोधक आहेत.

या पार्श्वभूमीवर सोलापूरची काँग्रेसची हक्काची जागा खेचून घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी केली आहे. रोहित पवारांचे वक्तव्य त्या दृष्टीने सूचक आहे. किंबहुना संपूर्ण महाविकास आघाडीतच नव्हे, तर काँग्रेस – राष्ट्रवादी या मूळ आघाडीत देखील त्यामुळे दरार उत्पन्न करण्याची ही चिन्हे आहेत.

On one hand BJP’s Mission 16 in Maharashtra; On the other hand, NCP is ready to take the rightful place of Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात