वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काँग्रेसचे 2014 मध्ये जे “माँ बेटी की सरकार” पासून वर्णन सुरू झाले होते, ते आता “भाई बहन की पार्टी” या पातळीपर्यंत उतरले आहे!! Congress is neither national nor Indian Uralli only “Bhai Bahan Ki Party” !!; BJP National President’s attack
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना देशभरातील सर्व राजकीय पक्षांची परखड चिकित्सा केली. त्या वेळी काँग्रेसचे वर्णन करताना जे पी नड्डा म्हणाले, की काँग्रेस आता ना राष्ट्रीय पक्ष उरला आहे, ना तो भारतीय पक्ष राहिला आहे. आता काँग्रेस फक्त “भाई बहन की पार्टी” एवढ्याच स्वरूपात उरला आहे.
Congress is neither national, Indian nor democratic, it's reduced to 'Bhai-Behen' party. What has shrunk Congress is their activities. They sidelined objectivity, and prioritized subjectivity…Such parties are BJP's threats, we are fighting them: BJP chief JP Nadda in Delhi pic.twitter.com/10pcphVbXM
— ANI (@ANI) May 19, 2022
देशाच्या राजकीय नकाशाचे वर्णन करताना जे. पी. नड्डा म्हणाले, की देशातले एकही राज्य असे नाही की जिथे परिवारवादी प्रादेशिक पक्ष अस्तित्वात नाही. प्रत्येक राज्यात तुम्ही जा. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी घराण्यातील वडील, मुलगा, बहीण, भाऊ, जावई, नातवंडे यांचेच राजकीय पक्ष जनतेला फसवत असताना दिसतील. या प्रादेशिक पक्षांकडे ना ना कोणते जनहिताचे कार्यक्रम आहेत, ना त्यांची राजकीय आणि सामाजिक दृष्टी विशाल आहे. या सर्व प्रादेशिक पक्षांचे उद्देश फक्त स्वतःच्या घराण्याची राजकीय सत्ता आपापल्या प्रदेशांवर टिकवून ठेवण्याची आहे. या पलिकडे त्यांना राष्ट्रीय उद्दिष्ट कोणतेही नाही.
या सर्व प्रादेशिक पक्षांचे जे. पी. नड्डा यांनी परिवाराची नावे घेऊन शरसंधान साधले. जम्मू-काश्मीरमध्ये अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवार आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिजीत बॅनर्जी परिवार आहे. महाराष्ट्र ठाकरे परिवार, पवार परिवार, तामिळनाडूत करुणानिधींचा परिवार, आंध्रा भमध्ये रेड्डी परिवार, तेलंगणामध्ये वायएसआर परिवार, ओरिसामध्ये पटनाईक परिवार, झारखंडमध्ये सोरेन परिवार यांचेच राज्य चालते, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.
Congress is neither national nor Indian Uralli only “Bhai Bahan Ki Party” !!; BJP National President’s attack
महत्वाच्या बातम्या