विशेष प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : देशातील प्रत्येक राज्यामध्ये वाढणाऱ्या कोरोणाच्या केसेस लक्षात घेता आणि ओमायक्रॉन या विषाणूचा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने नवीन गाईडलाईन्स जाहीर केले आहेत. या गाइडलाइन्स नुसार रात्री 11 ते सकाळी ५ वाजेपर्यंत आठवड्यातील सर्व दिवस कर्फ्यू असणार आहे. या काळामध्ये इमर्जन्सी सेवा जशा अॅम्ब्युलन्स, मेडिकल मात्र चालू असतील. पण मास्क हे कम्पलसरी करण्यात आले आहे.
Uttar Pradesh Omicron Guide Lines: Night curfew from 11 pm to 5 am in Uttar Pradesh, no masks no goods will be available in the shops
बाजारपेठांमध्ये मास्कशिवाय कोणी फिरत असेल, तर त्या व्यक्तीस दुकानदाराने सामान देऊ नये असे देखील आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे बाहेरून आलेल्या लोकांवर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
Omicron in Maharashtra : ओमिक्रॉनचा धोका-राज्यात नवी नियमावली जाहीर;काय आहेत नवे नियम?
रेल्वे स्टेशन आणि विमानतळ येथे विशेष सुरक्षा आणि काळजी घेण्याची देखील सूचना देण्यात आलेली आहे. ज्या लोकांना विलीगिकरण करण्याची गरज आहे, ज्यांना उपचाराची गरज आहे. त्यांना तातडीने उपचार दिले जावेत, क्वारंटाइन केले जावे असे देखील सांगितले आहे.
सार्वजनिक उत्सवांवर देखील आता निर्बंध लादण्यात आले आहेत. कोणत्याही उत्साहामध्ये 200हून अधिक लोकांना एकत्रित येण्यास मनाई केलेली आहे. सर्व आरोग्य व्यवस्था सोयी सुविधानी सज्ज ठेवण्याची देखील सूचना देण्यात आली आहे. मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांनी शुक्रवारी ह्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App