ओमायक्रॉनविरोधात केंद्राची राज्यांसाठी पंचसूत्री; लसीकरण, विविध निर्बंध ते नाईट कर्फ्यू!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात सातत्याने वाढणाऱ्या ओमायक्रॉनमुळे भीती वाढली आहे. देशात 320 पेक्षा अधिक ओमायक्रॉनग्रस्त आढळले आहेत. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वु राज्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना विरोधातली लढाई कायम ठेवावी, त्यासाठी तयार राहावे, असा सल्ला केंद्राने राज्यांना दिला आहे. Omicron central government issue guidelines to all states

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकासोबत आढवा बैठक घेतली. यामध्ये लसीकरणासह ओमायक्रॉन विरोधातील लढ्याच्या तयारीबाबतची माहिती जाणून घेतली. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कोरोनाच्या आलेखावर प्रकाश टाकला. तसेच ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाकडेही लक्ष वेधले.



रुग्ण पॉझिटीव्हीटी 10% पेक्षा जास्त वाढेल किंवा ऑक्सिजनयुक्त बेडची व्याप्ती 40% पेक्षा जास्त वाढेल तेव्हा जिल्हा/स्थानिक प्रशासनाद्वारे स्थानिक प्रतिबंधात्मक उपाय केले जातील. स्थानिक परिस्थिती आणि ओमायक्रॉनची उच्च फैलावक्षमता लक्षात घेऊन, राज्ये/केंद्रशासित प्रदेश प्रतिबंधात्मक उपाय करू शकतात आणि निर्बंध लादू शकतात, याचा पुनरुच्चार ही आरोग्य सचिवांनी यावेळी केला. कोणतेही निर्बंध किमान 14 दिवसांसाठी लागू केले पाहिजेत, असा सल्ला राज्यांना दिला.

ओमायक्रॉन व्हेरियंटची लक्षणे सामान्य सर्दीसारखी असतात, त्यांचा संक्रमणाचा दर जास्त असतो आणि कालावधी दुप्पट असतो, कोरोन प्रतिबंधासाठी केंद्राकडून राज्यांना पंचसूत्री देण्यात आली आहे.

 केंद्राची ही पंचसुत्री…

  •  सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्राच्या बाबतीत कठोर नियंत्रण करा. रात्री संचारबंदी लावा आणि विशेषत: आगामी उत्सवांच्या आधी, मोठ्या मेळाव्याचे कडक नियमन करा.
    कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नवीन ठिकाणांबाबतीत कंटेमेंटन झोन, बफर झोन यांची यादी तयार करा. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व क्लस्टर नमुने आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत पाठवा.
  •  चाचणी आणि लक्ष ठेवण्याबाबत, राज्यांना सर्व जिल्ह्यांमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन रुग्णसंख्येवर बारीक आणि कडक नजर ठेवून दररोज आणि प्रत्येक आठवड्याला रुग्ण पॉझिटीव्हीटी, दुपटीचा दर आणि नव्याने जास्त रुग्ण वाढणारी ठिकाणे या भागात प्रतिबंध सुरू करा. आरटी-पीसीआरचे योग्य प्रमाण सुनिश्चित करा: दररोज एकूण चाचण्यांमध्ये आरएटी (किमान 60:40) असावे. हे 70:30 गुणोत्तरापर्यंत वाढवले जाऊ शकते.
  •  बेडची संख्या वाढवा. रुग्णवाहिकांसारख्या खात्रीशीर प्रवासी सुविधावर लक्ष पुरवा. गरज पडल्यास रुग्णाला हलवण्यासाठीची व्यवस्थांची अंमलबजावणी करा. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सुरळीत आणि गरज भासल्यास वापरात असण्याची खात्री करून घेत रहा. किमान 30 दिवसांचा औषधांचा साठा राखीव राहू द्या. सध्याच्या नियमावलीनुसार गृहविलगीकरण/अलगीकरण यांचे सक्तीने पालन करा.
  •  नागरिकांना वारंवार सूचना आणि माहिती पुरवण्यासाठी तत्पर राहा, जेणेकरून भिती वा चुकीची माहिती पसरण्यास आळा बसेल. माध्यमांना नियमितपणे परिस्थितीबद्दल माहिती देणे.
  •  लसीकरण न झालेल्यांना तात्काळ पहिला डोस देण्याला प्राधान्य द्या. तसेच ज्याचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांचेही लसीकरण तात्काळ करा. 100 % लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या तसेच दोन्ही डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या राष्ट्रीय स्तरावरील लसीकरणाच्या सरासरीपेक्षा कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणावर विशेष लक्ष देणे. जेथे लसीकरण राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा कमी असेल तेथे घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम तीव्र करणे.

– येत्या काळात ज्या राज्यात निवडणूका होणार आहेत त्या राज्यांनी तातडीने लसीकरणाला वेग देणे.

Omicron central government issue guidelines to all states

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात