विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सतत वाढ होत असताना सरकारची इंधनावरील अबकारी शुल्कवसुली ८८ टक्क्यांनी वाढून ३.३५ लाख कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. सरकारतर्फे लोकसभेत ही माहिती देण्यात आली. Oil tax gave huge money to govt.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी इंधन दरवाढीसंदर्भातील प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरानुसार अबकारी शुल्क वाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलवरील करवसुली विक्रमी प्रमाणात वाढली आहे. अर्थात ही करवसुली केवळ पेट्रोल आणि डिझेलवरील नसून त्यात विमानांसाठीचे एटीएफ (एरो टर्बाईन फ्युएल), नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल यांचाही समावेश आहे.
मागील वर्षी पेट्रोलवरील अबकारी शुल्क १९.९८ रुपयांवरून ३२.९ रुपये, तर डिझेलवरील अबकारी शुल्क १५.८३ रुपयांवरून ३१.८ रुपये असे वाढविण्यात आले होते. यामुळे एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत इंधनावरील कर वसुली ३.३५ लाख कोटी रुपये झाली. मागील वर्षी ही करवसुली १.७८ लाख कोटी रुपये होती. ती पाहता यंदाची वाढ ८८ टक्क्यांनी अधिक आहे. इंधनावरील करवसुली वाढली असली तरी कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाऊनमुळे प्रत्यक्षात इंधनाचा खप कमी झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तत्पूर्वी, २०१८-१९ मध्ये ही करवसुली २.१३ लाख कोटी रुपये एवढी झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App