विशेष प्रतिनिधी
रायबरेली – कॉंग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि आता प्रियंका गांधी या दोघांनीही हिंदुत्वाची कास धरली की काय असे वाटण्यासारखी परिस्थीती सध्या निर्माण झाली आहे. प्रियांका गांधी यांनी काल रायबरेली येथील हनुमान मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली. याआधी राहुल गांधी यांनी शुक्रवारी जम्मूतील माता वैष्णोदेवी मंदिराला भेट दिली होती.Now Gandhi family owing hindus
दोघांचेही एकापाठोपाठ मंदिरात जाणे हे पक्षाची सोची समजी चाल असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. कॉंग्रेस केवळ मुस्लीमांचे तुष्टीकरण करते असा आरोप भाजप सतत करत आला आहे. त्याला छेद देण्यासाठी कॉंग्रेसचे नेते अधूनमधून अचानक हिंदु मंदिरांना भेटी देतात.
पण उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुका लक्षात घेवून गांधी घराण्यातील या दोघांनी आतापासूनच मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली आहे.आई सोनिया यांच्या संसदीय मतदारसंघात प्रियांका दोन दिवस आहेत. हे हनुमान मंदिर सिंहद्वार परिसरात आहे.
प्रियांका येण्यापूर्वी शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मंदिरात गेल्यानंतर प्रियांका यांनी हनुमानाच्या मूर्तीसमोर मस्तक टेकवले. त्या सुमारे पाच मिनिटे मंदिरात होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App