नोकरीच नसेल तर रविवार काय अन् सोमवार काय! केंद्र सरकारच्या ‘विकासा’वर राहुल गांधींची टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील नोकऱ्यांच्या स्थितीबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, जर देशात नोकर्‍याच नसतील, तर रविवार काय अन् सोमवार आहे काय? राहुल म्हणाले की, भाजप सरकारचे विकास मॉडेल असे आहे की रविवार आणि सोमवारमधील फरकच संपला आहे.If there is no job, what about Sunday and Monday! Rahul Gandhi’s criticism on the central government’s ‘development’!

रविवारी आपला ‘संडे थॉट’ लिहिताना राहुल गांधींनी ट्वीट केले, “भाजप सरकारचा ‘विकास’ असा आहे की, रविवार-सोमवारमधील फरक दूर झाला आहे… जर नोकरीच नसेल तर रविवार काय आणि सोमवार काय!”



खरं तर, राहुल गांधी यांनी ज्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे त्यात अमेरिकन ऑटो दिग्गज फोर्डने भारतीय बाजारातून आपला व्यवसाय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. फोर्ड ही ऑटोमोबाइल कंपनी भारतात आपला व्यवसाय बंद करत आहे. याआधीही, गेल्या काही वर्षांत फियाट, मान, जनरल मोटर्ससारख्या काही ऑटो कंपन्यांनी भारतात त्यांचे व्यवसाय बंद केले आहेत.

ज्या बातमीला राहुल गांधींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्यात असा दावा करण्यात आला आहे की, फोर्ड कंपनीने भारतातील आपला व्यवसाय बंद केल्याने 4000 छोट्या – मोठ्या कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो आणि अनेक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. यावर राहुल गांधी म्हणाले की, भाजप सरकारने असा विकास आणला आहे की, रविवार-सोमवारचा फरक संपला आहे. लोकांना नोकऱ्याच नाहीत, मग रविवार काय आणि सोमवार काय

If there is no job, what about Sunday and Monday! Rahul Gandhi’s criticism on the central government’s ‘development’!

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात