वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री आपले लक्ष्य असून सोमवारी (ता. १३) या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार आहे, असा गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी केला.I will expose the corruption of the two leaders Tomorrow : Bjp Leader kirit somaiya
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या दोन्ही नेत्यांची नावे मात्र आज उघड केलेली नाहीत. त्यामुळे प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून ते दोन नेते कोण आहेत ? त्याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात २४ हजार पाने आहेत. त्यात ठाकरे-पवार सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा गठ्ठा असून त्यात चार हजार पाने आहेत. तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत.
त्यांनी मला मोकळीक दिली आहे. सोमवारी ही नावे मी उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असे फडणवीस यांनी मला सांगितले आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असेही सोमय्या यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App