वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सचिवाने बेकायदेशीरपणे बंगला ताब्यात ठेवला असून त्यांच्याकडे ३ कोटीपेक्षा थकबाकी असल्याने त्यांना तत्काळ बंगला खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. Notice to Sonia’s secretary for immediate leave the bungalow: Action taken for over Rs 3 crore pending duo
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सचिव व्हिन्सेंट जॉर्ज बंगल्यात राहत होते.२०१३ मध्ये बंगल्याचे वाटप रद्द करण्यात आले होते. तेव्हापासून सचिवाने बंगला ताब्यात ठेवला आहे. एकूण देय रक्कम ३.०८ कोटी रुपये एवढी झाली आहे.
राजकीय पक्ष, मंत्री आणि संसद सदस्यांना बंगल्यांचे वाटप पाहणाऱ्या इस्टेट संचालनालयाने (डीओई) काँग्रेसला पक्षाला बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली आहे, असे एएनआयने वृत्त दिले आहे. DoE हाऊसिंग आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, बंगला क्रमांक C-II/109 चाणक्यपुरी येथील रहिवाशांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
अहवालानुसार, राजधानीतील ही मालमत्ता काँग्रेस पक्षाला वाटप करण्यात आली होती, परंतु काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सचिव व्हिन्सेंट जॉर्ज बंगल्यात राहत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App