प्रशांत किशोर नव्हे तर त्यांचा माजी सहकारी ठरविणार कॉँग्रेसच्या प्रचाराची रणनिती


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर नव्हे तर त्यांचा माजी सहकारी आता कॉँग्रेसच्या प्रचाराची रणनिती आखणार आहे. प्रशांत यांच्यासोबत आय-पॅक मध्ये एकत्र काम करणाऱ्या सुनील कानुगोलू यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे असून, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.Not Prashant Kishor but his former colleague will decide the campaign strategy of the Congress

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर कानुगोलू यांना हे काम सोपवण्यात आले आहे. 2023 मध्ये होणाºया विधानसभेच्या निवडणुकांची रणनिती सुनील आखणार आहे.प्रशांत किशोर यांचे सहकारी म्हणून कानुगोलू यांनी यापूर्वी भाजप, द्रमुक, अण्णाद्रमुक आणि अकाली दल यांच्यासोबत काम केले आहे.



गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये बंगाल विधानसभानिवडणुकीत तृणमूल काँग्रेसला दणका मिळाल्यानंतर प्रशांत किशोर म्हणजेच पीकेने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्याशी चर्चा केली होती.
या चर्चेत पीकेसाठी काँग्रेसचे सल्लागार किंवा पूर्णवेळ सदस्यत्व देण्याबाबतच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली होती.

त्यानंतर अनेक महिन्यांच्या शांततेनंतर प्रशांतने काँग्रेसच्या गांधी घराण्याच्या नेतृत्वाविरोधात उघडपणे मत व्यक्त करत राहुल गांधींवर अनेकदा हल्लाबोल केल्याने काँग्रेससोबतचा हा संवाद तुटल्याचे उघड झाले. मात्र, ही चर्चा का तुटली, हे काँग्रेस किंवा प्रशांत किशोर यांच्याकडूनही समोर आलेले नाही.

Not Prashant Kishor but his former colleague will decide the campaign strategy of the Congress

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात