पोलीसांनी टाकला छापा, प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात सापडला गांजा


विशेष प्रतिनिधी

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी व्यूहरचना आखत असलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात गांजा सापडला. परवरी येथे प्रशांत किशोर यांची संस्था ‘ आय-पॅक ‘च्या कार्यालयांवर पोलिसांनी छापा टाकला. त्याच्याकडे ड्रग्ज सापडले असून याप्रकरणी एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.Police raided Prashant Kishor’s office and found cannabis

गोव्यात परवरी येथे प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक संस्थेने आठ बंगले भाड्याने घेतले आहेत. या बंगल्यांवर शुक्रवारी पोलिसांनी छापा टाकला. या आठही बंगल्यांची झडती घेण्यात आली असून एका २८ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे गांजा सापडल्याचे सांगण्यात आले असून अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले असतानाच ही कारवाई झाली आहे.



प्रशांत किशोर हे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल कॉँग्रेसची प्रचाराची रणनिती आखत आहेत. गोव्यात यावेळी तृणमूल काँग्रेस व आम आदमी पार्टी ताकदीने लढत असून तृणमूलची व्यूहरचना आखण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आली आहे.

Police raided Prashant Kishor’s office and found cannabis

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात