उमेदवार विसरून जा, मोदींकडे पाहून मते द्या, अनुप्रिया पटेल यांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : मोदी सरकार बॉम्बस्फोटातून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुलामुलींना सुरक्षित मायदेशी आणत आहे. युक्रेनने रशियावर हल्ला केला आहे. तिथं चौफेर हल्ले होतायत, मात्र, सरकारचे चार मंत्री तिथे गेले असून नागरिकांना विमानात बसवून बॉम्बस्फोटातून सुरक्षित वाचवून घरी आणत आहेत.Forget the candidate, look at Anupriya Pateland vote, appeal of Anupriya Patel

त्यामुळे उमेदवार विसरून जा आणि मोदींकडे पाहून मते द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी केले आहे.भदोहीत प्रचारसभेत भाषण करताना अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं की, भदोहीतील काही मुलं आहेत. हे असतं मजबूत सरकार आणि हे सरकार तुम्ही बनवलं आहे. तुम्ही इथं कोणत्या उमेदवाराला मत द्यायला जात नाही आहात.



उमेदवाराला विसरून जा असेही त्यांनी म्हटले. देशाच्या विकासासाठी, मजबुतीसाठी आणि उत्तर प्रदेशच्या आनंदासाठी तुम्ही मत द्यायला जाणार आहात. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये जसा विश्वास दाखवलात तसा आताही दाखवा.

अनुप्रिया पटेल म्हणाल्या, मोदी सरकारने खूप काही केलं आहे. युक्रेन-रशिया लढाईमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले सुरु आहेत. चारही बाजुला आगीचे लोळ उठताना दिसत आहे. मात्र अशाही परिस्थितीत मोदी सरकार भारतीयांना सुखरूप मायदेशी आणत आहे.

तुम्ही याआधी भक्कम असं सरकारं दिलं आहे तर लक्षात ठेवा या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला मत देण्यासाठी जात नाही आहात. उमेदवाराला विसरा, एनडीएच्या सरकारने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येक गोष्ट केलीय. आमच्याकडे अनेक मोठ्या योजना आहेत. आम्ही उत्तर प्रदेशला नव्या युगात आणू .

Forget the candidate, look at Modi and vote, appeal of Anupriya Patel

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात