चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नाही, तर पंतप्रधान ली कियांग G 20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी दिली माहिती

विशेष प्रतिनिधी

बिजींग –  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जागी पंतप्रधान ली कियांग भारतात होणाऱ्या G-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) ही माहिती दिली. 9-10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे G-20 शिखर परिषद होणार आहे. ही 18वी जी-20 शिखर परिषद असेल. ली कियांग हे नवी दिल्लीत चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. Not Chinese President Xi Jinping but Prime Minister Li Qiang will attend the G20 summit

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले की, “भारतीय प्रजासत्ताक सरकारच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान ली कियांग 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत येथे होणाऱ्या 18 व्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.” प्रवक्ते माओ यांनी भारताने प्रथमच आयोजित केलेल्या या उच्चस्तरीय शिखर परिषदेला शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीचे कोणतेही कारण दिले नाही.

या आठवड्यात जकार्ता येथे होणार्‍या आसियान (दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना) आणि पूर्व आशिया शिखर परिषदेलाही अध्यक्ष शी उपस्थित राहणार नाहीत. इंडोनेशियातील आसियान शिखर परिषदेत पंतप्रधान ली चीनचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेनमधील ‘विशेष लष्करी ऑपरेशन्स’वर लक्ष केंद्रित करायचे असल्याने या परिषदेला वैयक्तिकरित्या उपस्थित न राहण्याचा निर्णय आधीच कळविला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या G-20 च्या बाली शिखर परिषदेलाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष आले नव्हते.

Not Chinese President Xi Jinping but Prime Minister Li Qiang will attend the G20 summit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub