विशेष प्रतिनिधी
जम्मू : जम्मू- काश्मीकरमधील १४९ वर्षांपासून चालत आलेली राजधानी हलविण्याची प्रथा मोडीत काढण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.ही प्रथा बंद झाल्यामुळे पैसा, वेळ आणि संसाधनांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या प्रथेमुळे जम्मू ते श्रीनगर अशी रस्ते मार्गानेच शासकीय कामकाजाच्या फायलींची वाहतूक करावी लागत असे.No shifting capital in Jammu and Kashmir in future
डोगरा राजवटीमध्ये १८७२ साली सुरू झालेली ही प्रथा १९४७ साली स्वातंत्र्यानंतरही तशीच चालू ठेवण्यात आली होती. महाराज गुलाबसिंग हे या प्रथेचे जनक मानले जातात. त्यांच्याच काळामध्ये श्रीनगर उन्हाळी तर जम्मू पावसाळी राजधानी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या प्रथेमुळे जम्मू-काश्मीीरमधील दोन वेगवेगळ्या भागांतील भाषक आणि सांस्कृतिक बंध अधिक मजबूत होतात असा दावा केला जात असे.मात्र या जुन्या प्रथेमुळे आठ ते नऊ हजार कर्मचाऱ्यांना धावाधाव करावी लागत असे.
शिवाय त्याचा प्रचंड आर्थिक बोजा पडत असे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल व न्या. राजनेश ओसवाल यांनी या प्रथेस, ‘व्यवस्थेवर ताण आणणारी प्रथा’ म्हणत ती बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App