कोरोना संसर्गामुळे कावडधारी भाविकांना यंदा हरिद्वारमध्ये मनाई

विशेष प्रतिनिधी

डेहराडून : उत्तराखंड सरकारने २४ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत हरिद्वारच्या ‘हर की पौडी’ येथे कावडधारी भाविकांना येण्यास मनाई केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता उत्तराखंड सरकारने १७ जुलैला यंदाची कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. No cavad yatra this year

स्थानिक नागरिक आणि परगावातून येणाऱ्या अन्य भाविकांसाठी कोणतेही निर्बंध नसतील. मात्र ७२ तासाच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाईल.



कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात आणि प्रवेशबंदीबाबत सूचना देऊनही हरिद्वारला कावडधारी येत असतील तर त्यांना सीमेवर अडवण्यात येईल आणि कारवाई होईल. यानुसार २४ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत भाविकांना ‘हर की पौडी’ येथे प्रवेश दिला जाणार नाही.

उत्तर राज्यातील शिवभक्त नागरिक पायी किंवा अन्य साधनांच्या मदतीने हरिद्वारला गंगा नदीचे पाणी घेण्यासाठी येतात. ही यात्रा २५ जुलैपासून सुरू होणार होती.

No cavad yatra this year

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात