भाजपसोबत मैदानात उतरण्याची केली आहे तयारी
विशेष प्रतिनिधी
पाटणा : झारखंड विधानसभा निवडणूक एकट्याने लढवणार नसल्याचे जेडीयूने स्पष्ट केले आहे. तेथेही एनडीएचा घटक म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार म्हणाले की, आमच्या आघाडीचे प्रमुख नेते एकत्र भेटून या विषयावर भविष्यातील रणनीती ठरवतील.
Devendra Fadnavis : मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या निर्मितीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल – देवेंद्र फडणवीस
झारखंडमध्ये पूर्ण बहुमताने एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी केला. झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत जेडीयूमध्ये पेच निर्माण झाल्याची माहिती आहे. पक्षातील एक गट स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा सल्ला देत आहे.
अपक्ष आमदार सरयू राय आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीनंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राय हे एकेकाळी भाजपचे आमदार होते, पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांचा पराभव केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App