पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी लालू प्रसाद आणि तेजस्वी प्रसाद यांच्यासह कुटुंबाविरोधात सीबीआय आणि ईडीच्या कारवाईवरून नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत सुशील मोदी म्हणाले की, तेजस्वी प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात छापेमारीमुळे सर्वाधिक आनंदी मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. छाप्यांमुळे राजदचा जो दबाव होता की, नितीशकुमार यांनी बिहारची सत्ता तेजस्वी यांच्याकडे सोपवावी आणि केंद्राच्या राजकारणात जावे, तो संपला आहे. असं सुशील मोदींनी म्हटलं आहे. Nitish Kumar most happy with action against Lalu Prasad Yadav and his family Sushil Modi
याशिवाय, तेजस्वी प्रसाद तुरुंगात जावेत अशी नितीश कुमारांची इच्छा आहे. ईडी आणि सीबीआयच्या प्रकियेत गती यावी, अशी त्यांची इच्छा आहे. तेजस्वी प्रसाद यांच्यावरील कारवाईसाठी नितीश कुमार आणि ललनसिंह जबाबदार आहेत. याशिवाय सर्वात मोठे जबाबदार तर लालू प्रसाद यादव आहेत, त्यांच्या पहिल्या कर्माची फळं आता त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भोगावी लागत आहेत. आता ते सहानुभूतीचं कार्ड खेळू इच्छित आहेत. अशा शब्दांमध्ये सुशील कुमार मोदींनी टीका केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी सांगितले की, लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध ठिकाणी छापे मारून एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. छाप्यांदरम्यान 600 कोटी रुपयांची गुन्ह्यातून कमावलेली संपत्ती उघड झाली आहे.
लँड फॉर जॉब स्कॅम : ईडीचा दावा- लालू कुटुंबीयांच्या ठिकाणांवरून 600 कोटींच्या संपत्तीचे पुरावे आढळले
ईडी सध्या माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांवर आणि नोकरीसाठी जमीन प्रकरणाशी संबंधित त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत आहे. ईडीने शुक्रवारी लालू प्रसाद यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी संबंधित दिल्लीतील अनेक ठिकाणी छापे टाकले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App