Nitin Gadkari : गडकरींना पंतप्रधानपदासाठी कोणी पाठिंबा दिला होता??, गडकरींनी तो का नाकारला??; वाचा आणि ऐका त्यांच्याच शब्दांत!!

विशेष प्रतिनिधी

नागपूर : एकदा अशीच घटना घडली मी नाव नाही सांगणार, पण मला एका नेत्याने तुम्ही पंतप्रधान होणार असाल, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातल्या एका कार्यक्रमात केला. पण त्याचवेळी त्यांनी मी माझ्या तत्वांशी आणि संघटनेशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे तुम्ही मला का पाठिंबा देता आणि मी तुमचा का पाठिंबा स्वीकारू??, असे विचारून तो पाठिंबा नाकारला, असे गडकरींनी स्पष्ट केले. गडकरींच्या या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत आली आहे. Nitin Gadkari says become prime minister support

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मूळचे मोदीविरोधक आणि फडणवीस विरोधक आणि त्यामुळे “गडकरी प्रेमी” असे अनेक नेते आहेत. शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांचे “गडकरी प्रेम” नेहमी उतू जात असते. पवार हे गडकरींची अनेकदा त्यांच्या कामाच्या तडफेबद्दल स्तुती करत असतात. त्यामागे गडकरींच्या प्रेमापेक्षा मोदी आणि फडणवीस यांचा विरोध अधिक असतो. राजकारणातले हे ताणेबाणे ओळखूनच गडकरींनी नाव न सांगता त्यांना आलेला पंतप्रधानपदासाठीचा पाठिंबा नाकारला होता. Nitin Gadkari

खुद्द गडकरी यांनीच स्वतःच्या तोंडी गौप्यस्फोट केल्याने “इंडी” आघाडीतले बाकीचे विरोधक देखील एक्स्पोज झाले. गडकरी म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी एकदा अशीच घटना घडली. मी नाव नाही सांगणार, पण एक जण माझ्याकडे आले आणि तुम्ही पंतप्रधान होणार असाल, तर आमचा तुम्हाला पाठिंबा असेल, असे मला सांगायला लागले. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट शब्दांत विचारले, तुम्ही मला पाठिंबा का देता आणि मी तरी तुमचा पाठिंबा का घेऊ?? पंतप्रधान बनणे हे काही माझ्या आयुष्याचे ध्येय नाही. मी माझ्या तत्त्वाशी आणि संघटनेशी पूर्ण एकनिष्ठ आहे. तत्व आणि संघटनेशी एकनिष्ठा हीच हेच भारतीय लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे!!

Nitin Gadkari says become prime minister support

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात