स्वावलंबी देश होण्यासाठी भारताला तेल आयात शून्यावर आणण्याची गरज आहे, असं गडकरी म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी जगातील पहिली 100 टक्के इथेनॉल इंधन असलेली कार लॉन्च केली. टोयोटा किर्लोस्कर मोटरने विकसित केलेला BS-VI (स्टेज-II) “इलेक्ट्रीफाइड फ्लेक्स फ्युएल व्हेईकल” चा हा जगातील पहिला प्रोटोटाइप आहे. Nitin Gadkari launched the worlds first 100 percent ethanol fueled car
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जगातील पहिले BS-VI (Stage-II), इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स-इंधन वाहनाचे लाँचिंग आज देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. स्वावलंबी देश होण्यासाठी भारताला तेल आयात शून्यावर आणण्याची गरज आहे.
इथेनॉल, एक स्वदेशी, पर्यावरणपूरक आणि अक्षय इंधन आहे, जे भारतासाठी आशादायक शक्यता ठेवते. गडकरी म्हणाले की, मोदी सरकारचा इथेनॉलवर भर ऊर्जा स्वयंपूर्णता साध्य करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, अन्न पुरवठादार म्हणून त्यांना सतत पाठिंबा देणे आणि पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पाडणे या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. ते म्हणाले की, ज्या दिवशी इथेनॉलची अर्थव्यवस्था 2 लाख कोटी रुपये होईल, त्या दिवशी कृषी विकास दर सध्याच्या 12 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App