घडलेल्या प्रसंगाबाबत ट्वीटद्वारे स्वत: दिली माहिती, जाणून घ्या काय म्हणाले? Nitin Gadkari got a shock on stage during his speech in Pusad
विशेष प्रतिनिधी
पुसद : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची प्रकृती बुधवारी पुन्हा एकदा खालावली. भाषण करताना मंचावर नितीन गडकरींना भोवळ आली. यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांना मंचावरच तातडीने बसवण्यात आलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यवतमाळ पुसद येथे निवडणूक रॅलीत भाषणादरम्यान नितीन गडकरी यांना चक्कर आल्याचे जाणवले. मात्र, काही वेळाने त्यांची प्रकृती सुधारली आणि ते उभे राहिले. यानंतर त्यांनी पुन्हा जाहीर सभेला संबोधित करण्यास सुरुवात केली.
ते बेशुद्ध झाल्यानंतर येथे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. नंतर त्यांना मंचावरून दूर नेण्यात आले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत दिली. यवतमाळमध्ये 26 एप्रिल (शुक्रवारी) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यवतमाळसह महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, हिंगोली, नांदेड आणि परभणी येथे मतदान होणार आहे.
राज्याच्या पूर्व-मध्य भागातील विदर्भातील यवतमाळमध्ये उन्हाचा कडाका जाणवत आहे. हवामान खात्यानुसार, महाराष्ट्राच्या काही भागात 27 ते 29 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू शकतो. हवामान खात्यानेही अलर्ट जारी केला आहे. नितीन गडकरी स्वतः नागपुरातून निवडणूक लढवत आहेत. तिथे पहिल्या टप्प्यातच मतदान झाले आहे. आता गडकरी आपल्या पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करणार आहेत.
भाजप नेते नितीन गडकरी यांनी त्यांच्या X सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले, ‘महाराष्ट्रातील पुसद येथील रॅलीदरम्यान उष्णतेमुळे अस्वस्थ वाटले. मात्र आता मी पूर्णपणे निरोगी असून पुढील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी वरुडला रवाना होत आहे. तुमच्या आपुलकी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App