Singhu border : शुक्रवारी सकाळी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनाच्या मुख्य स्टेजच्या मागे असलेल्या बॅरिकेडवर लटकवण्यात आला. त्यानंतर सिंघू सीमेवर शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. एका न्यूज वेबसाईटनुसार, त्या व्यक्तीची निहंगांनी हत्या केली होती. निहंगांनी त्या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह तिथे लटकवला होता. आता या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओपैकी एकामध्ये निहंगांनी त्या व्यक्तीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. Nihang confessed to killing a young man on the Singhu border video went viral
प्रतिनिधी
नवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनाच्या मुख्य स्टेजच्या मागे असलेल्या बॅरिकेडवर लटकवण्यात आला. त्यानंतर सिंघू सीमेवर शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. एका न्यूज वेबसाईटनुसार, त्या व्यक्तीची निहंगांनी हत्या केली होती. निहंगांनी त्या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह तिथे लटकवला होता. आता या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओपैकी एकामध्ये निहंगांनी त्या व्यक्तीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ते ‘जो बोले सो निहाल सत श्री अकाल’ म्हणत आहे, या पाप्याने सिंघू सीमेवर श्री गुरु ग्रंथ साहिबची विटंबना केली आहे. फौजेने त्याचा हात आणि पायही कापला.
एका न्यूज वेबसाईटनुसार, दुसऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये, निहंग सांगत आहेत की, तो तरुण रात्री निहांगांच्या तंबूत आला होता. जिथे श्री गुरु ग्रंथ साहिबचा प्रकाश करण्यात आला होता. गुरुग्रंथ साहिब उचलल्यानंतर तरुण पळू लागला तेव्हा सेवकांनी त्याला पकडले. त्या तरुणाचे कपडे काढले गेले तेव्हा त्याच्या डोक्यावर केस नव्हते आणि त्याने कछहरा घातला होता. निहंगांनी त्याची चौकशी केली. तेव्हा तो काही सांगायला तयार नव्हता, तेव्हा आधी त्याचा हात आणि नंतर पाय कापला गेला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
न्यूज वेबसाइटनुसार, या तरुणाचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. जवळचे लोक त्याचे व्हिडिओ बनवत आहेत. त्यादरम्यान त्याला विचारले जात आहे की तू कोण आहेस आणि कोठून आलास? त्याला अपमान केल्याची कबुली देण्यास सांगितले जात आहे, परंतु तो म्हणतो की सच्चे पातशाह गुरु तेग बहादूर यांनी निहंगांना मला ठार मारण्याचा आदेश द्यावा आणि मला त्यांच्या पायाशी ठेवावे. मी कबूल करतो. निहंगांनी माझा हात कापला आहे… यानंतर तेथे उपस्थित लोक विचारतात, तुझे नावदेखील सांग, तू कोठून आला आहेस, कोणी पाठवले आहे आणि तू काय केले आहेस?
न्यूज वेबसाइटनुसार, आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये, तो तरुण म्हणत आहे की त्याचा शिरच्छेद केला पाहिजे जेणेकरून वेदना कमी होतील. यावर तेथे उपस्थित असलेला निहंग त्याला सांगतो की तू वेदनांनी मरशील. व्हिडिओमध्ये काही लोक निहंगांचे आभार मानतानाही दिसत आहेत.
Nihang confessed to killing a young man on the Singhu border video went viral
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App