विशेष प्रतिनिधी
पणजी : कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने गोव्यातील पर्यटनाची चहल पहल सुरू झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नाईट कर्फ्यू म्हणजे रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली आहे.Night curfew in Goa
रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लोकांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रही जमता येणार नाही. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक मात्र सुरू असेल. त्यांना परवानगीची गरज नसेल.
गोव्यातील दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जातील. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी गोव्यात झाली होती. कॅसिनो, बार, रेस्टॉरंस्ट, मसाज पार्लर, चित्रपटगृहे, जीम, बससेवा ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
स्विमिंग पूल, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, क्रीडा, सांस्कृतिक संस्थेचे कार्यक्रम, राजकीय सभा, बैठका ३० एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद असतील. लग्न समारंभासाठी केवळ ५० जणांनाच एकत्र येता येईल. अंत्यविधीसाठी २० जणांनाच परवानगी असेल.
गोव्यात कोरानामुळे मंगळवारी २६ जणांचा मृत्यू झाला होता. दररोज हजारपेक्षा जास्त कोरोनाच्या रुग्णांची नोंद होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App