संजय काकडे यांना भोवला अजित पवारांशी पंगा, गुंड गजा मारणेच्या रॅलीला मदत केल्याच्या आरोपावरून झाली अटक


राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना पुण्यात मात्र राजकारणाचे डाव रंगत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सक्रिय असलेले भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्यात आली आहे. गुंड गजा मारणे याच्या रॅलीला आर्थिक मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. Sanjay Kakade also arrested for allegedly providing financial assistance to the rally


विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना पुण्यात मात्र राजकारणाचे डाव रंगत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सक्रिय असलेले भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्यात आली आहे. गुंड गजा मारणे याच्या रॅलीला आर्थिक मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यात संजय काकडे यांची भूमिका होती, असे बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना फोडुन भाजपात नेण्यातही काकडे यांचा मोठा वाटा होता. शरद पवार, अजित पवार यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्येही केली होती. त्यामुळे राज्यात सत्ताबदल झाल्यापासूनच काकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निशाण्यावर आहेत अशी चर्चा आहे.



काकडे यांचे व्याही माजी आमदार अनिल भोसले शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या प्रकरणात वर्षांपासून कारागृहात आहेत.
काकडे यांनाही राष्ट्रवादीशी घेतलेला पंगा भोवणार असे बोलले जात होते. त्याला निमित्त गुंड गजा मारणेची रॅली झाले आहे.गजा

मारणे याची काही दिवसांपूर्वी तळोजा कारागृहातून सुटका झाली. यावेळी त्याचे समर्थक मोठ्या संख्येने कारागृहाबाहेर जमले होते. सुमारे तीनशे वाहनांच्या ताफ्यासह मारणे याची रॅली निघाली होती. या प्रकरणात पोलिसांनी मारणेला अटक केली आहे. आता रॅलीला आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरून संजय काकडे यांनाही अटक करण्यात आली आहे.

Sanjay Kakade also arrested for allegedly providing financial assistance to the rally


महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात