गोव्यात सुरू झालेल्या देशातील पहिल्या सेक्स टॉय सेंटरला अखेर टाळे

लैंगिकतेला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले ‘सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट स्टोर’ या दुकानाला अखेर टाळे ठोकण्यात आले आहे.कंपनीकडे परवाना नसल्याने पंचायतीने दुकानाला टाळे ठोकले आहे. The first sex toy center in the country, which started in Goa, was finally closed


विशेष प्रतिनिधी

पणजी : लैंगिकतेला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले ‘सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट स्टोर’ या दुकानाला अखेर टाळे ठोकण्यात आले आहे.कंपनीकडे परवाना नसल्याने पंचायतीने दुकानाला टाळे ठोकले आहे.

१४ फेब्रुवारी म्हणजे ‘व्हेलेंटाईन डे’ च्या दिवशी भारतातील पहिले सेक्स टॉय स्टोअर कलंगुटमध्ये ओपन सुरू करण्यात आले होते. त्याची जाहिरातही करण्यात आली होती. ‘कामा गिझमो’ हे दुकान १४ फेब्रुवारी या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या कळंगुट येथे ठिकाणी उघडण्यात आले. ‘कामाकार्ट’ आणि ‘गिझमोसवाला’ यांनी ते संयुक्तपणे सुरू केले होते.कामाकार्ट हे दक्षिण भारतात लैंगिक कल्याण स्टोअर्सची साखळी चालवित आहेत, तर गिझमोस्वाला हे मुंबईबाहेरील एक आॅनलाइन सेक्स टॉय स्टोअर आहे. या दुकानात लैंगिकतेला प्रोत्साहन देणारे ‘स्प्रे’, ‘कंडोम’ आदींची विक्री केली जात होती. लॉकडाऊनच्या काळात लैंगिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या वस्तूंच्या ‘ऑनलाईन’ विक्रीमध्ये ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दुकानाला आतून एका औषधालयाचे स्वरूप देण्यात आले होते. संभाव्य विरोधाला सामोरे जाण्यासाठी दुकानासंबंधी सर्व कायदेशीर अनुज्ञप्त्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. दुकानाचे सहसंस्थापक निरव मेहता यांनी सांगितले होते की जोपर्यंत अश्लिलतेचे प्रदर्शन केले जात नाही, तोपर्यंत लैंगिकतेसंबंधी वस्तूंची विक्री कायद्याने करता येते. येथे दुकानात येणारे ग्राहक दुकानात अधिक वेळ थांबत नाहीत, तर वस्तू घेऊन त्वरित दुकानातून जातात.”

‘गोंयचो आवाज’ या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेने या दुकानाच्या विरोधात आवाज उठवला. राज्यात कॅसिनो, अमली पदार्थ यानंतर आता लैंगिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या सेक्शुअल वेलनेस स्टोरला प्रोत्साहन देण्याचा संघटनेने निषेध केला. या संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, गोव्यात कोणत्याही वस्तूंची विक्री होऊ शकते आणि गोव्यात सर्व प्रकारची विकृती आहे, अशी बदनामी होऊ लागली होती. या विरोधात आवाज उठवल्यानंतर आणि याविषयी वृत्ते माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर अखेर अनुमाने १६ मार्च या दिवशी सायंकाळी हे दुकान बंद झाले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पंचसदस्य आणि स्थानिक आमदार तथा बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांच्या सूचनेनंतर हे दुकान बंद करण्यात आले आहे.

The first sex toy center in the country, which started in Goa, was finally closed

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*