मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॅनडा आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एनआयएने बुधवारी खलिस्तानी दहशतवादी, गँगस्टर्स आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आणि सात राज्यांमध्ये 53 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. NIAs big action against Khalistani and gangsters Raids in 53 places in seven states many arrested
यावेळी एनआयएने काही लोकांना अटकही केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. बुधवारी पहाटे राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच NIA ने पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली NCR आणि उत्तराखंडमध्ये 51 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सचा कट उद्ध्वस्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या राजनैतिक भांडणाच्या पार्श्वभूमीवर, NIA ची भारतातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.
NIA ने ऑगस्ट 2022 पासून गँगस्टर्स आणि खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात UAPA अंतर्गत 5 खटले दाखल केले होते, ज्यामध्ये अर्शदीप डल्ला, लॉरेन्स बिश्नोई, देवेंद्र बंबीहा यांच्यासह अनेक जणांची नावे आहेत. एनआयएची कारवाई अर्शदीपच्या खलिस्तान टायगर फोर्सच्या संघटनेबाबतही आहे. अर्शदीपचे जवळचे सहकारी हॅरी मौर, गुरप्रीत सिंग गुरी आणि गुरमेल सिंग यांना अटक करण्यात आली. याशिवाय लॉरेन्स बिश्नोई, दीपक टिनू, सुखा डूनीके, कौशल चौधरी, भूपी राणा, सुखप्रीत सिंग आणि काला जथेडी या गँगस्टर्सच्या गुप्त ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
छापेमारीत मोठ्या प्रमाणात शस्त्रे, काडतुसे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. UAE, पाकिस्तान, कॅनडा आणि पोर्तुगालमध्ये बसलेले खलिस्तानी आणि गँगस्टर्स भारतातील ग्राउंड वर्कर्सनां ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांसाठी हवाला चॅनलद्वारे पैसा देत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App